आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Death Of Both The Children Injured And CCTV Footage | Updates In Karnal Accident

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भीषण अपघातात तडफडून मेले कुटुंब, आईनंतर 2 चिमुकल्यांनीही तोडला दम, वडीलही गंभीर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दुर्दैवी अपघातात रस्त्यावर पडलेला महिलेचा मृतदेह. - Divya Marathi
दुर्दैवी अपघातात रस्त्यावर पडलेला महिलेचा मृतदेह.
करनाल - करनाल-यमुनानगर रोडवर समौरा गावानजीक ट्रकच्या धडकेने जखमी झालेल्या दोन चिमुकल्यांचाही मृत्यू झाला. त्यांच्या आईचा तर घटनास्थळीच मृत्यू झाला होता. त्या वेळी ही दोन मुले आणि त्यांचे वडील गंभीररीत्या जखमी होते. जखमी झाल्याने त्यांना ट्रॉमा सेंटरमध्ये भरती करण्यात आले होते. तिथे उपचारांदरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
 
सीसीटीव्हीत कैद झाली दुर्घटना...
- मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी करनाल जिल्ह्याच्या जोहड माजरा गावातील नवीन (38) हे पत्नी ललिता (34), मुलगा लविश (10) आणि मुलगी घनिष्ठा (8) सह बाइकवर स्वार होऊन करनालकडे चालले होते.
- समौरा गावाच्या मागून येणाऱ्या वेगवान ट्रकने त्यांच्या बाइकला जोरदार टक्कर दिली. यामुळे ललिताचा जागेवरच मृत्यू झाला. तर पती नवीन, मुलगी घनिष्ठा आणि मुलगा लविश गंभीर जखमी झाले होते.
- जखमींना रुग्णालयाच्या ट्रॉमा केंअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते. येथे दोन्ही मुलांचा प्रकृती गंभीर होऊन मृत्यू झाला.
- दुसरीकडे, पोलिसांनी अपघातानंतर काही अंतरावरच ट्रकसह ड्रायव्हरला रोखून त्याच्यावर गुन्हा दाखल केला. या अपघाताचे सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांच्या हाती लागले आहे.
 
हे दिसतेय सीसीटीव्ही फुटेजमध्ये
- अपघाताचे लाइव्ह फोटोजमधून स्पष्ट दिसतेय की कशाप्रकारे एका ट्रकला क्रॉस करून बाइकला दुसऱ्या ट्रकने चिरडले आणि ट्रक सुसाट निघून गेला.
- पूर्ण कुटुंब रस्त्यावर विखुरले आणि वेदनांनी विव्हळत होते. हे पाहून आसपास उभ्या असलेल्या लोकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पोलिस तसेच अॅम्ब्युलन्सला माहिती देण्यात आली.
 
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, या दुर्दैवी अपघाताचे आणखी फोटोज...
बातम्या आणखी आहेत...