आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जम्मू-काश्मिरमधील दहशतवादी हल्ल्यात शहीद जवानाच्या पत्नीची आत्महत्या

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोलकाता- जम्मू-काश्मिरमधील दहशतवादी हल्ल्यात वीरमरण आलेल्या एका जवानाच्या पत्नीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. शहीद जवान आदित्य नंदी यांची पत्नी पियू नंदी (25) यांनी बांकूडा येथे आत्महत्या केली.

आदित्य नंदी यांना वीरमरण आल्याची बातमी समजताच, त्यांच्या पत्नी पियू नंदी यांनात्यांना दु:ख अनावर झाले. पतीचा वियोग सहन न झाल्यामुळे त्यांनीही या जगाचा निरोप घेतला.

दरम्यान, 'हिजबुल मुजाहिदीन' या दहशतवादी संघटनेने गेल्या सोमवारी भारतीय जवानांच्या ताफ्यावर दशतवादी हल्ला केला होता. त्यात आठ जवान शहीत तर 14 जण जखमी झाले होते.

पहिला हल्ला सकाळी श्रीनगरच्या क्लासिक हॉस्पिटलजवळ झाला. दुस-या एका हल्ल्यात अतिरेक्यांनी बरजाला पोलिस चौकीवर गोळीबार केला. यात दोन पोलिस जखमी झाले. क्लासिक हॉस्पिटलजवळ जवानांच्या ताफ्यावर झालेल्या पहिल्या हल्यात मोठी जीवित हानी झाली. हे जवान पंत चौकातून बारामुल्लाकडे जात होते. दबा धरून बसलेल्या अतिरेक्यांनी वाहनावर तुफान गोळीबार केला. लष्कराचा ट्रक मागच्या बाजूने उघडा असल्याने दोन जवान जागीच मृत्युमुखी पडले. हल्ल्यानंतर शेजारच्या इमारतीत पळालेल्या अतिरेक्यांना जवानांनी घेरले. या वेळी झालेल्या चकमकीत आणखी तीन जवान शहीद झाले. तीन जखमी जवानांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला होता.