आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

McDonaldsच्या फूडमध्ये सापडली मृत पाल, गरोदर महिलेच्या तक्रारीनंतर FIR दाखल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोलकाता- अमेरिकन फास्ट फूड कंपनी मॅकडोनाल्डच्या (McD) खाद्यपदार्थात मृत पाल आढळल्याचे समोर आले आहे. कोलकाता येथील रहिवासी महिलेने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

प्रियांका मित्रा असे तक्रारदार महिलेचे नाव असून ती 6 महिन्यांची गरोदर आहे. तिने याप्रकरणी मॅकडोनाल्ड आऊटलेटच्या मॅनेजरकडे याबाबत तक्रार केली. 'सॉरी' म्हणून तो तेथून निघून गेला. मात्र, धाडसी महिलेने थेट पोलिस स्टेशन गाठून याबाबत तक्रार केली आहे. या तक्रारीची दखल घेऊन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मॅकडोनाल्डचे पदार्थ हानीकारक असल्याचे सांगत कंपनीची सखोल चौकशी करण्‍यात यावी, अशी मागणी प्रियांका मित्रा यांनी केली आहे.

मॅकडोनाल्डचे पदार्थ हानीकारक
- न्यूज एजन्सी 'एनएनआय'नुसार, प्रियांका 28 फेब्रुवारीला मॅकडोनाल्डच्या आउटलेटमध्ये गेली होती. तिने फ्रॅन्चफ्राय ऑर्डर केले होते.
- तिचे पॅकेट उघडून पाहिले असता फ्रॅन्चफ्रायमध्ये मृत‍ पाल आढळली. प्रियांका 6 महिन्यांची गरोदर आहे. पालकडे लक्ष गेले नसते तर माझ्या पोटातील बाळाचे काय झाले असते? याबाबत कल्पनाच करायला नको, असे प्रियांकाने म्हटले आहे.  याबाबत तिने आपल्या फॅमिली डॉक्टरांचाही सल्ला घेतला आहे.
- प्रियांकाच्या बहीणीने सांगितले की, एका व्यक्तीने फेसबुकवर तिच्याशी संपर्क सांधून पोलिसांत तक्रार करू नका, असे म्हटले आहे.

पुढील स्लाइडवर क्लि करून पाहा... महिलेने शेअर केलेला व्हिडिओ...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
बातम्या आणखी आहेत...