आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Deependra Singh Hooda\'s Wife Shweta Mirdha, Rohtak Haryana

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTO: ही आहे सीएमची सून, खासदाराची पत्नी आणि दिग्गज नेत्याची नात!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रोहतक- हरियाणा विधानसभा निवडणूक तोंडावर आली असताना सर्व राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. त्यात राज्याचे विद्यमान मुखमंत्री भूपेंद्र सिंह हुड्डा यांनी तिसर्‍यांदा मुख्यमंत्रीपदासाठी दावेदारी केली आहे. यंदा मात्र भूपेंद्र सिंह हुड्डा यांच्यासाठी त्यांची सून प्रचारकार्यात सहभागी होणार आहे.

हरियाणा विनाधसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच मुख्यमंत्री भूपेंद्र सिंह हुड्डा यांनी हालचाली सुरु केल्या आहे. विशेष म्हणजे हुड्डा यांचे चिरंजिव आणि खासदार दीपेंद्र सिंह हुड्डा यांच्यासह त्यांची पत्नी श्वेता मिर्धा या प्रचार कार्यात सहभागी होणार आहेत.

लोकसभा निवडणुकीत खासदार दीपेंद्र हुड्डा हे तिसर्‍या कॉंग्रेसच्या तिकिटावर निवडून आले आहेत. खासदार दीपेंद्र यांच्या यशात त्यांचे वडील भूपेंद्र सिंह हुड्डा आणि त्यांची पत्नी श्वेता हुड्‍डा यांचा मोलाचे योगदान आहे. श्वेता मिर्धा- हुड्डा यांनी अमेरिकेतून एमबीए केले आहे.

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात दिसणार श्वेता मिर्धा
श्वेता मिर्धा-हुड्डा यांचे माहेर राजस्थानातील नागोर येथील आहे. श्वेता या पहिल्यांना लोकसभा निवडणुकीत पती दीपेंद्र यांचा प्रचार करताना दिसल्या होत्या. आता विधानसभा निवडणुकीत श्वेता हुड्‍डा आपले सासरे भुपेंद्र सिंह हुड्डा यांच्यासाठी प्रचार करताना ‍दिसणार आहेत. कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या यूथ बिग्रेडमध्ये दीपेंद्र हुड्‍डा यांना मानाचे स्थान आहे.

राजस्थानमधील दिग्गज नेत्याची नात आहे श्वेता...
श्वेता मिर्धा-हुड्डा या राजस्थानातील दिग्गज जाट नेते आणि पाच वेळा खासदार राहिलेले नाथूराम मिर्धा यांची नात आहे. श्वेता यांनी राजकारणापासून नेहमी लांब राहणेच प्रसंत केले. मात्र, श्वेता यांची बहिण ज्योती मिर्धा या राजस्थानच्या नागोर येथील खासदार आहेत.
20 फेब्रुवारी 2010 रोजी दीपेंद्र आणि श्वेता यांचा विवाह झाला होता. श्वेता ही दीपेंद्र यांची दुसरी पत्नी आहे. अमेरिकेत शिक्षण घेतलेल्या श्वेता यांनी अनेक आंतरराष्‍ट्रीय कंपन्यांमध्ये काम केले आहे. यात इंटरनॅशनल फायनान्स कॉर्पोरेशन, इंडिया बुल्स आणि रॉबर्ट हाफ इंटरनॅशनल सारख्या कंपन्यांचा समावेश आहे.

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा, दीपेंद्र आणि श्वेता यांची पर्सनल लाइफ...
(फोटो: रोहतकचे खासदार दीपेंद्र सिंह हुड्डा आणि त्यांची पत्नी श्वेता)