आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एका मुलाची आई झाली IAS अधिकारी, आठ वर्षानंतर मिळाले यश

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रांची - आपल्या इच्छेला आपली जिद्द बनवून त्यासाठी सर्वस्व झोकून देणारे व्यक्तीमत्व म्हणजे दिपमाला. आयएएस अधिकारी होण्याची दिपमाला यांची इच्छा आणि जिद्द अखेऱ आठ वर्षांनी पूर्ण झाली आहे. कठोर मेहनतीने त्यांनी आपले ध्येय गाठले आहे. सध्या अनगडा जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी असलेल्या दिपमाला सांगतात की 2007 पासून मी आयएएसची तयारी करत होते. अखेर पाचव्या प्रयत्नात यूपीएससी 2013 मध्ये मला यश मिळाले आहे.
याआधी दीपमाला दोन वेळा मुलाखतीपर्यंत पोहोचल्या होत्या. मात्र दोन्ही वेळेस त्यांच्या हाती निराशा आली होती. त्यानतंर जेपीएससीच्या परीक्षेत उत्तीर्ण होईन त्या उपजिल्हाधिकारी झाल्या आणि अनगडा येथे मुख्यकार्यकारी अधिकारी पदी पोस्टींग मिळाली. दीपमाला सांगतात, आय़ुष्यात अनेक चढ-उतार आले, पण माझे ध्येय मी नजरेच्या टप्प्यातून दूर जाऊ दिले नाही. सरकारी नोकरीत असतानाही मी रोज तीन तास अभ्यास करत होते आणि मुलाची दैनंदिन कामे व अभ्यास घेत होते.
मम्मी... अखेर तुझे कष्ट फळाला आले
दीपमालांनी सांगितले की, मी यूपीएससीचा निकाल पहिल्यानंतर ही आनंदाची बातमी सर्वात पहिले माझ्या मुलाला सांगितली. तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद शब्दातित होता. तो म्हणाला, मम्मी ... अखेर तुझी जिद्द पूर्ण झाली. ती आयएएस अधिकारी झाली. अखेर तुझे कष्ट फळाला आले आहेत. माझ्या मुलाने केलेले कौतुक मला आयुष्यभर लक्षात राहाणारे आहे. माझा मुलगा विशेष आता पाचवीत आहे. दीपमाला यांनी सांगितले, की त्यांचे वडिल सदन प्रसाद गुप्ता उद्योजक आहेत, तर आई सुधा गुप्ता या एलबीएस शाळेच्या संचालक आहेत.
दलालांच्या तावडीतून लोकांना मुक्त करायचे
सीईओ म्हणून कार्यरत असलेल्या दीपमाला म्हणाल्या, मी ज्या कार्यालयता सध्या आहे त्याला दलालांचा विळखा असतो. खेड्या-पाड्यातून गोरगरीब लोक आपले काम घेऊन येतात आणि या दलालांच्या तावडीत सापडतात. ते त्यांच्याकडून पैसे उकळतात आणि अधिकाऱ्यांवर दबाव टाकून किंवा दमदाटी करुन काम करुन घेतात. यात त्या गरीब जनतेची मोठी आर्थिक फसवणूक होते. ही फसवणूक मला बंद करायची आहे. यात आमच्या शासकीय सेवेतील कर्मचारीही काही वेळा फाइल डंप करुन ठेवतात आणि त्यामुळे काम उरकण्यास उशिर होतो. यापासून सर्वसामान्यांची सुटका करायची आहे.

झारखंडमध्ये पोस्टींग हवी
दीपमाला म्हणाल्या मला झारखंडमध्येच पोस्टींग मिळाली तर अधिक आनंद होईल. मला येथील जनतेसाठी काही तरी करण्याची इच्छा आहे. पण सरकार जे काम देईल ते करण्याची माझी तयारी आहे.
मुलगा आणि मुलगी भेदभाव केला नाही
दीपमाला यांच्या आई सुधा गुप्ता यांनी सांगितले, की मी मुलगा आणि मुलगी असा कधीही फरक केला नाही, म्हणूनच आज मी एका आयएएसची आई आहे. दीपमाला जेव्हा पतीचे घरसोडून आमच्याकडे आली तेव्हा आम्ही ठरवले की आपले दोन नाही तीन मुलगे आहेत. जर आम्ही मुलगा-मुलगी असा भेदभाव केला असता तर मी एका आयएएसची आई झाले नसते.
बातम्या आणखी आहेत...