आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेजारणीवर जडला होता विजय माल्ल्याचा जीव, या अब्जाधीशाची अशी होती रंगेल लाइफ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - चंदेरी दुनियेचा जादूगार, या मायानगरीशी निगडित त्याचे अनेक किस्से आहेत. येथील सुंदर ललनांचा तो दिवाना आहे, जिला पसंत करतो तिच्यावर कॅलेंडर बनते. जमीन असो वा आकाश - वेगाचा याला भारी छंद आहे. ज्याने जगाला आपल्या सभोवती नाचवले, तो आज जमीनदोस्त झालेला आहे.
- हे सर्व आहे अशा अब्जाधीशाबद्दल ज्याला किंग ऑफ गुड टाइम्स म्हणजेच सुंदर क्षणांचा राजा असे म्हटले जायचे. बिअर, व्हिस्की, आयपीएल टीम, फुटबॉल क्लब, फॉर्म्युला वन रेसिंग आणि हो एअरलाइन्स... हे सर्व विजय माल्ल्याचे शौकच नव्हते तर बिझनेसही होते. असा हा विजय माल्ल्या तुरुंगाच्या भीतीने देश सोडून लंडनमध्ये पळालेला आहे.
 
माल्ल्याने केली दोन लग्ने
कोलकातामध्ये जन्म झालेल्या माल्ल्याचे वडील विठ्ठल माल्ल्या देशाचे नावाजलेले उद्योगपती होते. त्यांच्या आईचे नाव ललिता रमेय्या असे होते. विजय माल्ल्या यांची 2 लग्ने झालेली आहेत. त्यांच्या पहिल्या पत्नीचे नाव समीरा माल्ल्या आहे. त्या एकेकाळी एअर इंडिया एअरलाइन्सच्या एअरहोस्टेस होत्या. सिद्धार्थ माल्या हा समीरा आणि विजय माल्ल्या यांचा मुलगा आहे. माल्ल्यांनी दुसरे लग्न रेखा माल्ल्याशी केले.

शेजारणीवर जडला जीव
- समीरानंतर विजय माल्ल्या यांनी दुसरे लग्न बंगळुरूमध्ये त्यांच्या शेजारीच राहणाऱ्या रेखा यांच्याशी केले. रेखा आणि विजय या दोघांचेही हे दुसरे लग्न होते. रेखाचे पहिले पती मिस्टर महमूद हे विजय माल्ल्या यांचे चांगले मित्र होते आणि पहिल्या पतीकडून रेखा यांनी एका मुलीला - लैलाला जन्म दिला. दुसऱ्या लग्नानंतर रेखा यांनी विजय माल्ल्या यांच्यासह दोन मुलींना जन्म दिला. मिळालेल्या माहितीनुसार दोन्ही मुली लीना माल्ल्या आणि तान्या माल्ल्या या कॅलिफोर्नियात प्रशस्त घरात राहतात.
 
पुढच्या स्लाइड्सवर पाहा,  शौकिन-रंगेल अन् कर्जबुडव्या माल्ल्याचे काही फोटोज...
बातम्या आणखी आहेत...