आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Defence Minister Manohar Parrikar Nomination Rajyasabha BJP Candidate

अर्ज अपूर्ण राहिल्याने मनोहर पर्रीकरांचा राज्यसभा उमेदवारी दाखल करण्यास उशिर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनऊ - केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी उत्तर प्रदेशातून राज्यसभेसाठी उमेदवारी दाखल केली आहे. मात्र, त्यांचा उमेदवारी अर्ज अपूर्ण असल्याने अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया लांबली होती.
पर्रीकर दुपारी एक वाजताच्या सुमारास उत्तर प्रदेश विधानसभेत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी हजर झाले होते. यावेळी त्यांच्यासोबत केंद्रीय मंत्री कलराज मिश्र, राजीव प्रताप रुडी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष लक्ष्मीकांत वाजपेयी उपस्थित होते.
गोव्याचे माजी मुख्यमंत्री असलेल्या पर्रीकरांनी रविवारी केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. मात्र ते लोकसभा किंवा राज्यसभेचे सदस्य नसल्याचे रविवारी रात्रीच लखनऊमध्ये दाखल झाले. लखनऊ विमानतळावरच त्यांनी सांगितले की उत्तर प्रदेशसोबत माझे जुने नाते आहे. येथूनच ते राज्यसभेवर जाणार आहेत. ते म्हणाले, राज्याच्या विकासासाठी शक्य ते प्रयत्न केले जातील.