आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Defence Minister Say\'s Some Former PMs Compromised With \'assets\'

देशाच्या सुरक्षिततेशी काही माजी पंतप्रधानांनी केली तडजोड, पर्रिकरांचा खळबळजनक आरोप

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - भारताच्या काही माजी पंतप्रधानांनी देशाच्या सुरक्षिततेबाबत हितांशी तडजोड केली असल्याचा धक्कादायक आरोप संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी केला आहे. मात्र त्यांनी कोणाचेही नाव घेणे टाळले आहे. सुत्रांचा हवाला देत पर्रिकर यांनी हा बॉम्ब टाकला आहे.

दरम्यान, या प्रकारानंतर काँग्रेसने तीव्र रोष व्यक्त केला आहे. गेल्या सहा दशकांमध्ये बहुतांश कालावधीसाठी काँग्रेस सत्तेवर राहिली आहे. त्यामुळे पर्रिकर यांनी स्पष्टपणे नावे घ्यावी अन्यथा, माफी मागावी अशी मागणी काँग्रेसने केली आहे.

गेल्या महिन्यात नववर्षाच्या पहाटे पोरबंदरवर परिसरात घुसलेल्या बोटविरोधात कोस्ट गार्डने ऑपरेशन राबवले होते. त्यावेळी पाकिस्ताच्या त्या बोटीवर असलेल्या चौघांनी त्या बोटीवर स्फोट घडवत बोट उडवून दिली होती. त्यात चौघांचाही मृत्यू झाला होता. या हल्ल्यासंदर्भात अधिक माहिती देण्यास पर्रिकरांनी नकार दिला आहे. तसे केल्यास माहितीच्या स्त्रोताला धोका असल्याचे पर्रिकर म्हणाले. अशाच प्रकारे यापूर्वीच्या काही पंतप्रधानांनी सुरक्षेसंदर्भातील हितांशी तडजोड केल्याचे पर्रिकर म्हणाले होते.

काय म्हणाले पर्रिकर...
आम्ही सुमारे दोनशे किलोमीटरपर्यंत या बोटचा पाठलाग केला. त्यांचा भारताच्या हद्दीत प्रवेश करण्याचा प्रयत्न सुरू होता. हे पुरेसे पुरावे नाहीत का? आणखी काय हवे असा सवाल यावेळी पर्रिकर यांनी पत्रकारांना केला. मला पुरावा मागण्यात आला. पण मी स्पष्ट नकार दिला. कारण त्यामुळे स्रोताला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. अशा प्रकारचे स्रोत हे देशाची संपत्ती असतात. ती आपणच जपायला हवी. त्यासाठी 20-30 वर्षे लागतात. पण या देशात असेही काही पंतप्रधान होऊन गेले ज्यांनी याच्याशीच तडजोड केली. मला कोणाचीही नावे घ्यायची नाहीत. अनेकांना याबाबत माहिती आहे, असे पर्रिकर मुंबईतील एका कार्यक्रमात बोलताना म्हणाले.
पुढे वाचा, पर्रिकरांनी काँग्रेसला काढलेला चिमटा...