आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

संरक्षण उपग्रह ‘जी सॅट 7’ उड्डाणास सज्ज, फ्रेंच गयाना येथून उद्या अवकाशात झेपावणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बंगळुरू - संपूर्ण भारतीय बनावटीचा ‘जी सॅट 7’ हा उपग्रह अवकाशात झेपावण्यासाठी सज्ज झाला आहे. शुक्रवारी फ्रेंच गयाना येथील कौरौ स्पेसपोर्टहून हा उपग्रह अवकाशात दाखल होईल. खास नौदलासाठी हा उपग्रह तयार करण्यात आल्याने सागरी किना-याच्या सुरक्षेला हातभार लागणार आहे.


संरक्षण उद्देशासाठी तयार करण्यात आलेला असा हा पहिलाच उपग्रह आहे. त्याच्या फ्रिक्वेन्सी बँडमुळे सागरी प्रवासादरम्यान संवाद साधणे सुलभ होणार असल्याचे भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या उपग्रह बनवणा-या पथकातील अधिका-याने सांगितले. जी सॅटची वजन पेलण्याची क्षमता 2,625 किलोएवढी आहे. इस्रोच्या 2500 किलो सॅटेलाइटवर हा आधारित असून त्यात अँटेनासारखे तांत्रिक बदल करण्यात आले आहेत. यामध्ये सौरऊर्जेपासून 2900 वॅट वीज तयार करण्याची क्षमता आहे. ग्रहण काळात काम करण्यासाठी यामध्ये 108 अ‍ॅम्पिअरची बॅटरी आहे.