आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पदवी बनावट असेल, पण स्मृती इराणी खऱ्या; लालुंनी केली पाठराखण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाटणा - स्मृती इराणी यांच्या पदवीवरुन वाद सुरू असतानाच राजद प्रमुख लालूप्रसाद यादव त्यांच्या बचावासाठी समोर आले आहेत. पाटणा येथे बोलताना लालू म्हणाले की, पदवी बनावट असू शकते, पण त्या (स्मृती इराणी) तशा नाहीत. आपल्याला पदवीशी काय संबंध? ईराणी असली आहेत. त्या एक महिला आहेत. त्यांनी 'सास भी कभी बहू थी' सारख्या मालिकेत काम केले आहे. त्या माझा आदर करतात, असे ते स्मृती इराणींबाबत म्हणाले.

पदवीचा वाद...
स्मृती इराणी यांनी गेल्या 11 वर्षांत निवडणूक आयोगाला दिलेल्या तीन वेगवेगळ्या प्रतिज्ञापत्रांमध्ये शिक्षणाबाबत वेगवेगळी माहिती दिली आहे. लेखक आणि तक्रारकर्ते अहमर खान यांनी दाखल केलेल्या अर्जानुसार स्मृती यांनी लोकसभा, राज्यसभा निवडणुकीदरम्यान दाखल केलेल्या तीन प्रतिज्ञापत्रांमध्ये शैक्षणिक पात्रतेबाबत चुकीची माहिती दिली होती. याबाबत 24 जूनला सुनावणी करण्याचा निर्णय दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाने घेतला आहे.

संपूर्ण केंद्र सरकारच बनावट
पक्षाच्या कार्यकर्त्यांना भेटल्यानंतर लालूप्रसाद यादव म्हणाले की, केंद्रातील संपूर्ण सरकारच बनावट आहे. ते म्हणाले, ''केंद्र सरकार 100 स्मार्ट सिटी बनवण्याच्या वल्गणा करत आहे. पण ते काय करू शकतील हे पाहाच. सरकारने बुलेट ट्रेनचे आश्वासन दिले पण त्यासाठी 60 हजार कोटी कुठून आणणार, असा सवालही लालुंनी केला.

खेड्यांवर लक्ष केंद्रीत करा
लालूप्रसाद यांनी यावेळी मोदी सरकारला सल्ला देत म्हटले की, शहरे नवरीप्रमाणे सजवण्याऐवजी गावांच्या सुधारणेवर लक्ष केंद्रीत करायला हवे. पंतप्रधानांनी सुरू केलेली 'आदर्श ग्राम योजना' ठप्प झाल्याचा दावाही त्यांनी केला. या योजनेसाठी सरकारकडे पैसे नाहीत, गंगा स्वच्छता अभियानाचेही तेच झाल्याचा आरोपही केला.

बिहारमध्ये भाजपला रोखणार
लालुप्रसाद म्हणाले, '' भाजप बिहारमध्ये शक्य त्या पद्धतीने सत्ता मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. पण विधानसभा निवडणुकीत आम्ही त्यांची योजना यशस्वी होऊ देणार नाही. बिहारमध्ये 'अबकी बार नितीश कुमार', याचा स्वीकार आमच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. आम्ही प्रचाराला सुरुवातही केली आहे.

बातम्या आणखी आहेत...