आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Delhi Ajmer Shatabdi Run 8 Km With Broken Wheels

मोठा अनर्थ टळला, तुटलेल्या चाकावर ताशी 110 वेगाने आठ किलोमीटर धावली \'शताब्दी\'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो- शताब्दी एक्स्प्रेसचे तुटलेले चाक)

जयपूर- देशात सगळ्यात वेगात धावणार्‍या रेल्वे एक्स्प्रेसपैकी एक असलेली 'दिल्ली-अजमेर शताब्दी एक्स्प्रेस' सोमवारी (10 नोव्हेंबर) थोडक्यात बचावली. ताशी 110 किलोमीटर वेगाने धावत असलेल्या शताब्दी एक्स्प्रेसचे एक चाक तुटून पडल्यानंतरही ती आठ किलोमीटर धावली. आसलपूर-जोबरनेर रेल्वे स्टेशनदरम्यान एक्स्प्रेस थांबण्यात येऊन तिचे चाक बदलण्यात आल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली. शताब्दी एक्स्प्रेसमध्ये विदेशी पर्यटकांसह 300 प्रवाशी प्रवास करत होते.
अशी समजली माहिती...
सोमवारी सकाळी 11 वाजता शताब्दी एक्स्प्रेस धावत असताना धपधप आवाज येत होता. तसेच मोठ्याप्रमाणात धूरही बाहेर निघत असल्याचे गेटमन कालूराम यांनी पाहिले. कालूराम याने बोबास स्टेशन मास्टरला याबाबत तत्काळ सूचना दिली. जोबनेर स्टेशनवर तपासणी शताब्दी थांबवण्यात आली. गाडीची तपासणी केली असता 'जनरेटर कार यान'चे पहिले चाक तुटून पडले होते.

...तर रुळावरून घसरली असती शताब्दी!
शताब्दी एक्स्प्रेस ताशी 110 ते 140 किलोमिटर वेगाने धावते. चाक तुटल्याने शताब्दी एक्स्प्रेस रुळावरून घसरून मोठी दुर्घटना झाली असती. मात्र, गेटमन कालूरामची सजगता आणि ड्रायव्हर-गार्डच्या प्रसंगावधान राखून इमरजेंसी ब्रेक लावून रेल्वे गाडी थांबवली.

या घटनेची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आल्याची माहिती सीपीआरओ तरुण जैन यांनी दिली आहे.

चाक बसवताना केली जाते अल्ट्रासोनिक टेस्ट...
रेल्वेच्या डब्याला चाक बसवताना चाकाची 'अल्ट्रासोनिक टेस्ट' केली जाते. चाकला असलेली हलकासा तडाही या चाचणीत समोर येतो. त्यामुळे अल्ट्रासोनिक टेस्ट लॅबमधील कर्मचार्‍यांकडून टेस्ट करताना चूक होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

तसेच शताब्दी एक्स्प्रेस रवाना होण्यापूर्वी दिल्ली कोच यार्डमध्ये इन्टेंसिव्ह टेस्ट देखील केली जाते. कोणत्या पार्ट्‍सची केव्हा तपासणी केली जाते, याबाबत एक नियमावली तयार करण्यात आलेली असते. या टेस्टमध्ये चाकाचा 'स्मूथनेस' तपासला जातो.