आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंजाबच्या मुख्यमंत्रिपदाचा विचार अद्याप केला नाही!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालंधर- अरविंद केजरीवाल पंजाबच्या निवडणुका लढवत असल्याने सध्या चर्चेला उधाण आले आहे. ते स्वत: रिंगणात उतरतील वा नाही याविषयी अद्याप विचार केला नसल्याचे त्यांनी सांगितले.

प्रश्न : तुम्ही स्वत: निवडणूक लढवणार का?
उत्तर : यासंबंधीमी सध्या तरी काही सांगू शकणार नाही.

प्रश्न: तुम्ही स्वत: किंवा तुमच्या पत्नीला मुख्यमंत्री बनवू इच्छिता का?
उत्तर : माझीपत्नी राजकारणात सक्रिय सहभाग घेईल याच्या शक्यताच नाहीत. मी स्वत:विषयी अद्याप काही विचार केलेला नाही.

प्रश्न: तुम्ही पंजाबच्या मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास का घाबरत आहात?
उत्तर :
मुख्यमंत्री कोण होणार हा आमच्यासाठी महत्त्वाचा मुद्दा नाहीच. आम्ही वेगळ्या मुद्द्यांवर विचार करत आहोत. मात्र मुख्यमंत्रिपदाचा आमचा उमेदवार निश्चितच पंजाबशी कटिबद्ध असेल अशी मी खात्री देतो.

प्रश्न: निवडणूकपूर्व चाचणीविषयी काय सांगाल?
उत्तर :
निवडणूकपूर्व चाचण्या बनावट असतात. दिल्लीच्या निवडणुकीपूर्वी आम्हाला जागा मिळणार असे सांगितले होते. मात्र हे भाकीत खोटे ठरले. आम्हाला २८ जागा मिळाल्या. दुसऱ्या वेळी आम्हाला २३ जागा मिळणार असे भाकीत होते मात्र प्रत्यक्षात ६७ जागा मिळाल्या. भाजपला ४२ जागा मिळतील असे अनुमान होते. त्यांना जागा मिळाल्या. पंजाबमध्ये आम्ही निवडणूकपूर्व चाचणी करवली आहे. ९६ जागा मिळतील असे आपले भाकीत आहे.

प्रश्न: छोटेपूरला भ्रष्टाचारप्रकरणी निलंबित केले. त्यांची सीडी प्रसारित झाली नाही.
उत्तर: जूनपासून दिल्लीतस्थित माझ्या जनता दरबारात पंजाबच्या लोकांनी माझ्याकडे अनेक तक्रारी केल्या. छोटेपूर पैसे घेतो. मी त्यांना पुरावे सादर करण्यास सांगितले. काही महिन्यांनंतर लोक सीडी घेऊन आले. त्या पाहिल्यानंतर खात्री पटली. त्यानंतर छोटेपूरला बोलावण्यात आले. आपली चूक त्यांनी कबूल केली. त्यांना आम्ही निलंबित केले. तक्रारकर्त्यांना सीडी प्रसारित करायची नव्हती. त्यामुळे ती प्रसिद्धीस दिली गेली नाही.

प्रश्न: कायदा सुव्यवस्थेसाठी तुम्ही काय करू इच्छिता?
उत्तर : पंजाबमध्ये सध्या गुंडाराज आहे. सरकार बनल्यानंतर पोलिसांना उत्तरदायित्व दिले जाईल. गेल्या दहा वर्षांत दलितांवर अनेक अत्याचार झाले. त्याच्या चौकशीसाठी विशेष कृती दल स्थापले जाईल.

प्रश्न: सिद्धूसोबत बोलणी सुरू आहेत का ?
उत्तर : मी नवज्योत सिद्धूंविषयी पूर्वीपासून आदर बाळगतो. आजही मला त्यांच्याविषयी आदर आहे. बोलणीचा विषय म्हणाल तर आमचे धोरण खुले आहे. प्रत्येकाशी संवादास आम्ही उत्सुक आहोत.

प्रश्न: कोणता जनताभिमुख मुद्दा तुम्हाला सर्वात महत्त्वाचा वाटतो?
उत्तर : पंजाबमध्ये अमली पदार्थ आणि भ्रष्टाचारामुळे सुव्यवस्था नाही. बादल आणि कॅप्टन हे परस्परांचे हितसंबंध जपतात. कॅप्टनने तीन वर्षांपूर्वी मजिठियाची सीबीआय चौकशी बंद केली. त्या बदल्यात बादल यांनी त्यांच्याविरुद्ध सुरू असलेल्या अमृतसर इंप्रूव्हमेंट ट्रस्ट खटल्याला बंद करवले आहे.
बातम्या आणखी आहेत...