आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Delhi CM Arvind Kejriwal Unhappy With Ex Law Minister Jitendra Tomar After The RTI Turns Fake Which Was Produced By Tomar To Kejri

भागलपूर विद्यापीठात जितेंद्र सिंह तोमर यांना अंडी आणि टोमॅटोचा \'प्रसाद\'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जितेंद्र सिंह तोमर यांना मुंगेर येथे पोहोचले दिल्ली पोलिस - Divya Marathi
जितेंद्र सिंह तोमर यांना मुंगेर येथे पोहोचले दिल्ली पोलिस
मुंगेर/भागलपूर(बिहार)- विधी शाखेची बनावट पदवी मिळवून बनवेगिरी केल्याच्या आरोपात अटक करण्यात आलेल्या दिल्लीच्या माजी कायदामंत्र्यांना भागलपुरात अंडी आणि सडक्या टोमॅटोचा 'प्रसाद' मिळाला. भागलपूर येथील तिलका मांझी विद्यापीठाच्या संतप्त विद्यार्थ्यांनी जितेंद्र सिंह तोमर यांच्यावर अंडी व टोमॅटो फेकले. 'आप'चे नेते तोमर यांनी आमच्या विद्यापीठाची बदनाम‍ी केल्याचे या विद्यार्थ्यांनी म्हटले आहे.
दिल्ली पोलिसांनी तोमर यांना गुरूवारी भागलपुर येथे आणले होते. भागलपुरमधील तिलका मांझी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.रमाशंकर दुबे यांच्यासोबत दिल्ली पोलिसांनी भेट घेतली. याआधी पोलिसांनी तोमर यांनी मुंगेर येथे नेले. मुंगेर येथील विश्वनाथ सिंह विधी महाविद्यालयात पोलिसांनी चौकशी केली. आपल्याला नावापुढे 'अॅडव्होकेट' लिहिण्याची आवड असल्याने आपण हा गुन्हा केल्याचे जितेंद्र सिंह तोमर यांनी यावेळी सांगितले. वकील मित्रांच्या सांगण्यावरून आपण रजिस्ट्रेशन केले. विशेष म्हणजे तोमर यांच्या नावावर वकील मित्रानेच परीक्षा दिल्याची अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.

दिल्ली पोलिसांच्या पथकाने विश्वनाथ सिंह विधी महाविद्यालयाचे प्राचार्य आर.के.मिश्रा यांची तीन तास चौकशी केली. पोलिसांना या चौकशीत तोमर यांच्याविरुद्ध महत्त्वाची दस्ताऐवज मिळाले आहेत.
मुंगेर महाविद्यालयाला छावणीचे रुप
दिल्ली पोलिसांनी तोमर यांना मुंगेर येथे प्रचंड पोलिस बंदोबस्तात आणले . विधी महाविद्यालयाच्या परिसरातही ठिकठिकाणी पोलिस तैनात करण्‍यात आले होते. त्यामुळे महाविद्यालयाला छावणीचे रुप आले होते.
मुंगेरला पोहोचताच बिघडली तोमर यांची तब्बेत
दिल्ली पोलिसांच्या पथकाने तोमर यांना मुंगेर येथे आणले असता तोमर यांची अचानक तब्बेल बिघडली. तोमर यांच्या सामान्य रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्‍यात आले. नंतर त्यांना मुंगेर येथील विश्वनाथ सिंह विधी महाविद्यालयात आणण्यात आले.
तोमर यांच्या चौकशीसाठी दोन पथके...
तोमर यांची चौकशी दोन पोलिस पथकांकडून केली जात आहे. एका पथकाने मुंगेर येथील विधी महाविद्यालयात तर दुसर्‍या पथकाने भागलपूर येथील तिलका मांझी विद्यापीठात चौकशी केली.
पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, संबंधित PHOTO...