आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अरविंद केजरीवाल होणार पंजाबचे पुढील मुख्यमंत्री; मनीष सिसोदिया यांचे मोहालीत वक्तव्य

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मोहाली- पंजाब विधानसभा‍ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पक्षाने मंगळवारी प्रचार रॅली काढली. पंजाबचे पुढील मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल होणार असे वक्तव्य दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी केले आहे.

पंजाबचा मुख्यमंत्री कोण? असे काही लोक विचारतात. त्यावर सिसोदिया म्हणाले की, असे समजा की, पंजाबचे पुढील मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल होणार आहेत.

दरम्यान, निवडणुकीनंतर मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवाराच्या नावाची घोषणा करण्यात येईल, असे केजरीवाल यांनी 7 जानेवारीला जालंधरमध्ये झालेल्या सभेत सांगितले होते.

आश्वासने पूर्ण करण्‍याची जबाबदारी केजरीवाल यांच्याकडे असेल... 
- मीडिया रिपोर्टनुसार, सिसोदिया यांनी सांगितले की, पंजाबचा मुख्यमंत्री जो कोणी बनेल तो बनेल, परंतु जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करण्याची संपूर्ण जबाबदारी ही केजरीवाल यांची असेल. 
- भाजपच्या विजेंद्र गुप्ता यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले की, केजरीवाल दिल्लीतून पलायन करण्याच्या तयारीत आहेत.

अमरिंदर सिंग सर्वाधिक लोकप्रिय नेते
- एबीपी न्यूज-लोकनीती-सीएसडीएसच्या सर्व्हेनुसार, 29 टक्के लोकांनी अमरिंदर सिंग यांना तर 20 टक्के लोकांनी प्रकाश सिंह बादल यांना मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून मत नोंदवले आहे. 
- भगवंत मान यांना केवळ 08 टक्के जनतेने प्रतिसाद दिला आहे.

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...