आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Delhi Election: AAP Internal Survey Gives Itself 51 Seats

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Delhi Election : आपने सर्वेक्षणात स्वतःला दिल्या 51 जागा, भाजपला केवळ 15

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - विविध वृत्तवाहिन्यांनी केलेल्या सर्वेक्षणात पूर्ण बहुमत मिळत नसल्याचे चित्र स्पष्ट आल्यानंतर आम आदमी पार्टी (आप)ने त्यांच्या अंतर्गत सर्वेक्षणाचे अंदाज प्रसिद्ध केले आहेत. आपच्या या ताज्या सर्वेक्षणानुसार पक्षाला दिल्लीत केवळ बहुमतच नव्हे तर मोठा विजय मिळणार आहे. सर्वेक्षणात आपने दिल्लीतील 70 पैकी 51 जागांवर आपला विजय होणार असल्याचे चित्र मांडले आहे.
फोटो - आपच्या सर्वेक्षणातील अंदाज.

आपने 31 जानेवारी ते 1 फेब्रुवारीदरम्यान दिल्लीच्या 35 विधानसभा मतदारसंघात हे सर्वेक्षण केले आहे. एकूण 3188 लोकांची मते या सर्वेक्षणात जाणून घेण्यात आली आहेत. सर्वेक्षणाच्या अंदाजांबाबत सांगताना आप नेते योगेंद्र यादव म्हणाले की, जर निकाल आमच्यासाठी अत्यंत चांगले ठरले तर आम्ही 57 पर्यंत बाजी मारू शकतो. त्याचप्रमाणे आमच्या अंदाजापेक्षा वाईट निकाल लागले तरीही आम्ही किमान 44 जागा मिळवू असा अंदाज त्यांनी व्यक्त केला.
आपने बुधवारी सादर केलेले सर्वेक्षणाचे आकडे.

सर्वेक्षणातील प्रमुख अंदाज
- आपला 70 पैकी 51 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सर्वेक्षणातील अंदाजानुसार भाजपला 15 तर काँग्रेसला 4 जागा मिळत आहेत.
- केजरीवाल अजूनही मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवाराच्या शर्यतीत दिल्लीकरांची पहिली पसंत बनलेले आहेत. 53 टक्के लोकांनी त्यांना पसंती दर्शवली. तर किरण बेदींना 34 टक्के आणि अजय माकन यांना 7 टक्के लोकांनी मते दिली.
- या सर्वेक्षणानुसार आम आदमी पार्टीला एकूण मतांपैकी 46 टक्के मते मिळणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. तर भाजपला 33 आणि काँग्रेसला केवळ 11 टक्के मिळत असल्याचे चित्र आहे.
भाजपचा बचाव
या सर्वेक्षणांनंतर भाजप बॅकफूटवर गेल्याचे चित्र आहे. दिल्ली निवडणुकांचे निकाल केंद्र सरकारच्या कामगिरीवर ठरणार नसल्याचे व्यंकय्या नायडू बुधवारी म्हणाले. या मुख्यमंत्रीपदाच्या निवडणुका आहेत, पंतप्रधान पदाच्या नव्हे. भाजप आणि इतरांत हा लढा असल्याचे ते म्हणाले.

इतर सर्वेक्षणांचे अंदाज
- एबीपी न्यूज नीलसनच्या दोन दिवसांपूर्वीच्या सर्वेक्षणात आम आदमी पार्टीला 35, भाजपला 29 आणि काँग्रेसला 6 जागा मिळण्याची शक्यता वर्तवली होती.

- इंडिया टुडे-सिसिरोच्या सर्वेक्षमात आपला 38-46, भाजपला 19-25 तर काँग्रेसला केवळ तीन ते सात जागा मिळण्याचा अंदाज वर्तवला होता.

- इंग्रजी वृत्तवाहिनी टाइम्स नाऊच्या ‘पोल ऑफ पोल्स’ च्या पाच सर्वेक्षणांच्या आधारावर आपला 34, भाजपला 32 आणि काँग्रेसला चार जागा मिळत असल्याचे संकेत दर्शवले आहेत.
पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, सर्वेक्षणातील इतर अंदाज