आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काश्मीर ते कन्याकुमारी, लंडन ते लडाखपर्यंत 9 वर्षांच्या भटकंतीत टिपले 1 लाख फोटो

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमृतसर - जिद पे अड जा, जिद पकड ले, जिंदगी को जिद बना, चल चला चल एक दिन मंजिल करेगी खुद सलाम. जिद्दीचा हा सकारात्मक पैलू माणसासाठी अशक्य ते शक्य करताे. याचे उत्कृष्ट उदाहरण दिल्लीच्या छायाचित्रकार चांदनी बत्रा यांचे आहे. त्यांनी सुरुवातीस आवड म्हणून सुरू केलेला छायाचित्रणाचा छंद त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. त्या फोटोग्राफीसाठी देश-विदेशात एकट्या फिरल्या. सर्वसाधारणपणे पुरुष ज्या दुर्गम भागात जाण्यास धजावणार  नाहीत,अशा ठिकाणी त्यांनी छायाचित्रे काढली. चांदनी यांच्या छायाचित्रांचे पाचदिवसीय प्रदर्शन येथील ‘ह्युमन स्पेस’ एस. जी. ठाकर सिंह आर्ट गॅलरीत सोमवारी सुरू झाले.
 
चांदनी यांनी नऊ वर्षे काश्मीरपासून कन्याकुमारी  व लंडन ते लडाखपर्यंत  जवळपास  एक लाख दुर्मिळ छायाचित्रे काढली. यामध्ये भारतातील विविध राज्यांचे नैसर्गिक सौंदर्य, जीवनशैली, राहणीमान, सांस्कृतिक वैविध्य, लंडनमधील शाही विवाह व तेथील राहणीमानाच्या छायाचित्रांचा समावेश आहे. या प्रदर्शनात त्या रोज ४० छायाचित्रांचा समावेश करणार आहेत.
 
दोन भाऊ व एका बहिणीच्या मधल्या चांदनी यांचे आई-वडील डॉक्टर आहेत. त्या म्हणाल्या, मला सुरुवातीला छायाचित्राचा छंद नव्हता. मात्र, काही वर्षांपूर्वी एक कॅमेरा घेऊन काही छायाचित्रे काढल्यानंतर आवड वाढत गेली. त्यानंतर गेल्या ९ वर्षात छायाचित्रण करत आहे. त्यासाठी त्या बनारस घाट, धर्मशाला, जम्मू-काश्मीर,लेह-लडाख, राजस्थानचे रणक्षेत्र, अंदमानसह देशातील अनेक भागात फोटोग्राफी केली आहे. पर्वतरांगांवर १४,००० फूट उंचीवरही त्यांनी छायाचित्र काढले आहे. याच पद्धतीने पठार, वाळवंट आणि वनक्षेत्रातही छायाचित्रासाठी जोखीम घेतली. अनेकदा तर श्वास गुदमरला, थकवा येत होता मात्र तरीही यशाने साथ दिली. या कामात आई-वडील व पती पाठीशी होते.
बातम्या आणखी आहेत...