आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नोटबंदीमुळे राहुल, ममता यांची झोप उडाली : अमित शहा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बंगळुरू - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नोटबंदीच्या निर्णयामुळे विरोधी नेते राहुल गांधी व ममता बॅनर्जी यांची रात्रीची झोप उडाली आहे, अशा शब्दांत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी टीका केली आहे.

मित्रांनो, काळा पैसा गमावणारेच लोक या निर्णयामुळे दु:खी झाले आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी, ममता बॅनर्जी, अरविंद केजरीवाल यांच्यासह अनेक नेत्यांच्या चेहऱ्यावरील चमक कमी झाली आहेे, असे शहा म्हणाले. रविवारी भाजपच्या वतीने आेबीसी वर्गाच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात शहा मार्गदर्शन करताना बोलत होते. ७ नोव्हेंबरपर्यंत बसप, सपा, काँग्रेससह अनेक पक्षांच्या नेत्यांकडून मोदींना काळ्या पैशांवरून विचारणा केली जात होती. त्यात ममता, अरविंद केजरीवाल यांचा समावेश होता. हेच नेते काळा पैसा परत आणा, अशी मागणी करत होते. परंतु आठ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून परिस्थितीत बदल झाला. तेच नेते नोटबंदी का आणली, असा प्रश्न विचारू लागले आहेत, असा टोलाही त्यांनी हाणला.

पुराच्या गोष्टीसारखे...
नोटबंदीच्या निर्णयावर विरोधकांनी दाखवलेल्या एकजुटीचाही शहा यांनी समाचार घेतला. ते म्हणाले, सध्याची परिस्थिती पूर आल्यासारखी आहे. पूर आल्यानंतर पाण्याच्या मधोमध झाड असेल तर त्यावर उंदीर, मांजर, मुंगूस, साप सारेच चढून जाण्याचा प्रयत्न करतात. अर्थात आपसांतील वैर विसरून परस्पर सहकार्य करू लागतात. पूर आेसरेपर्यंत त्यांची परस्परांना मदत असते, असे शहा म्हणाले.
बातम्या आणखी आहेत...