आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मर्यादेपेक्षा जास्त कॅश जमा करणाऱ्यांना इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडून नोटीस मिळण्यास सुरवात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई/इंदूर - नोटबंदीनंतर बँकांमध्ये जास्त रक्कम जमा करणाऱ्यांना प्राप्तीकर विभागाने (आईटी) नोटीस पाठवायला सुरुवात केली आहे. पश्चिम बंगालच्या सिलुगुडी आणि सिक्कीमची राजधानी गंगटोकमध्ये अशा प्रकारच्या नोटीस पाठवण्यात आल्या आहेत. संबंधितांकडे मोठी कॅश जमा करण्याबाबत स्पष्टीकरण मागण्यात आले आहे. गुरुवारी अर्थमंत्रालयानेही बँका आणि पोस्ट ऑफिसेसना नोटिफिकेशन पाठवून कोणत्याही अकाऊंटमध्ये दिवसाला 50 हजार आणि 30 डिसेंबरपर्यंत 2.5 लाखापेक्षा अधिक जमा केल्यास त्याबाबत आयटी विभागाला माहिती देण्याचे निर्देश दिली होते.

25 नोव्हेंबरला हजर राहण्याचे आदेश..
- इनकम टॅक्स ऑफिसर, असिस्टंट आणि डेप्युटी कमिश्नर आता कोणत्याही करदात्याची फाइल स्वतः स्क्रुटनीला घेऊन कमाई आणि खर्चाचा पूर्ण हिशेब मागू शकतात.
- याबाबत सीबीडीटीने 16 नोव्हेंबरला नोटिफिकेशन सादर केले होते.
- आधी कॉम्प्यूटर असेसमेंट स्क्रूटनी सिस्टम (कास) मध्ये समोर येणाऱ्या ठरावीक फाइलच असेसमेंट ऑफिसरकडून असेसमेंटसाठी घेतल्या जात होत्या.
- साधारणपणे या सिस्टीममध्ये 100 पैकी दोन तीन फाइल असेसमेंटसाठी जायच्या.
- असेसमेंट ऑफिसरला एखाद्या फाइलमध्ये गडबड वाटली तरच डिपार्टमेंटचे चीफ कमिश्नर किंवा प्रिंसिपल कमिश्नर यांच्या परवानगीने ती फाइल उघडता येत होते.
- आता अधिकाऱ्यांना ही मंजुरी घ्यायची गरज राहणार नाही. अशा वेळी ते त्यांच्या अख्त्यारीत येणाऱ्या कोणत्याही करदात्याच्या फाइलची स्क्रुटनी करू शकतात.

जानेवारीपासून मोठ्या प्रमाणावर वापर..
- सर्व सीएंनी करदात्यांसाठी हा अत्यंत कठोर निर्णय असल्याचे सांगितले आहे.
- 30 डिसेंबरनंतर याचा मोठ्या प्रमाणावर वापर होणार असल्याचे सांगितले जात आहे. कारण त्यादरम्यान बँकांकडूनही आयटी डिपार्टमेंटला कोणी कोणी खात्यात अडीच लाखापेक्षा अधिक जमा केले याची माहिती मिळू शकेल. त्यावेळी अधिकारी करदात्याला त्याचा हिशेब विचारू शकेल.

पुढे पाहा, अर्थमंत्रालयाने जारी केलेले नोटिफिकेशन...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...