आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदी नव्हे, देवेगौडा पहिले आेबीसी पंतप्रधान - नितीश कुमार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाटणा - बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधला आहे. नरेंद्र मोदी पहिले आेबीसी पंतप्रधान असल्याचा अमित शहा यांचा दावा त्यांनी खोडून काढला आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष चुकीची वक्तव्ये करत आहेत. वास्तविक, एच.डी. देवेगाैडा देशाचे पहिले आेबीसी पंतप्रधान आहेत, असा दावा नितीश कुमार यांनी केला. शनिवारी एका कार्यशाळेत नीतिश कुमार बोलत होते. लोकसभा निवडणुकीत सत्ता मिळाल्यानंतर भाजपने मागासवर्गीय जातीचा खूप फायदा करून घेतला. परंतु सत्तेवर आल्यानंतर जातीय गणनेचा अहवाल मात्र जाहीर का केला जात नाही?