आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Departmental Inquary Stopped Against Durgashakti

दुर्गाशक्तींविरुद्धची खातेनिहाय चौकशी बंद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लखनऊ - महिला आयएएस अधिकारी दुर्गाशक्ती नागपाल यांच्याविरुद्धची खातेनिहाय चौकशी बंद करण्यात आली आहे. सरकारने त्यांच्या निलंबनाचा आदेश मागे घेतल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.


सरकारने निलंबन मागे घेतल्यानंतर खातेनिहाय चौकशी करण्यात अर्थ नाही, असे वरिष्ठ अधिका-याने सांगितले. नागपाल यांनी गौतमबुद्धनगरच्या उपविभागीय अधिकारी म्हणून घेतलेल्या निर्णयाची गृह विभागाचे मुख्य सचिव आर.एम.श्रीवास्तव यांनी चौकशी सुरू केली होती. दुर्गाशक्ती नागपाल यांनी पती अभिषेक सिंग यांच्यासोबत रविवारी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांची भेट घेऊन निर्णयाबाबत स्पष्टीकरण दिले. यानंतर त्यांचे निलंबन मागे घेण्यात आले. नागपाल यांनी वाळू तस्करांविरुद्ध कडक भूमिका घेतली होती. मात्र, मशिदीची भिंत पाडण्याचा आदेश दिल्यामुळे त्यांना निलंबित करण्यात आल्याचे अखिलेश यांनी त्यांना सांगितले होते.