आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

1 लाख रुपये किमतीला विकले जात होते लोणचे, राम रहिम स्वतः करायचा ब्रँडिंग

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंचकुला - साध्वी लैंगिक शोषण प्रकारणात  20 वर्ष कैदेची शिक्षा भोगत असलेल्या राम रहिमचे रोज नवे किस्से समोर येत आहेत. बाबाने भक्तांचा श्रद्धेचा अक्षरशः बाजार मांडला होता. याआधीच्या वृत्तात आम्ही बाबाच्या शेकडो एकर शेतीतील भाजीपाला आणि फळे हजारो रुपये किमतीला विकली जात असल्याचे सांगितले होते. आता समोर आले आहे की बाबा आश्रमात सीलबंद पदार्थही तयार करत होता आणि त्याची विक्री करत होता. बाबाच्या अंधभक्तांची श्रद्धा होती की बाबा स्वतःच्या हाताने हे पदार्थ तयार करत होता आणि ते खाल्लानंतर कोणताही आजार होत नाही. राम रहिम त्याच्या खाद्य पदार्थांची जाहिरात स्वतः करत होता आणि त्याची स्ट्रॅटिजी देखील तो स्वतः ठरवत होता. 
 
सोन्यापेक्षा महाग मिळत होता भाजीपाला 
- सिरसा येथील 700 एकर परिसरात विस्तारलेल्या बाबाच्या डेऱ्यात शेकडो एकर जमीनीवर शेती केली जात होती. 
- या शेतीतील भाजीपाला आणि फळांची विक्री प्रसाद म्हणून केली जात होती. एक-एक फळ हजारो रुपयांना विकले जात होते. 
- याशिवाय आता समोर आलेल्या माहितीनुसार सीलबंद पदार्थांमध्ये राम रहिमचे सर्वात महागडे उत्पादन हे लोणचे होते. एक लाख रुपये किलो भावाने त्याची विक्री होत होती. लोणचे तयार करण्यासाठीची कैरी ही डेऱ्यातील आंबेच्या बागेतीलच असायची. 
- भक्त सोन्याच्या भावात हे पदार्थ विकत घेत होते. 
- बाबा रामदेव यांच्या सारखीच राम रहिमची 'बिझनेस बाबा' होण्याच्या दिशेने वाटचाल सुरु होती. डेऱ्यात तयार होणाऱ्या पदार्थांचे तो स्वतः ब्रँडिग करत होता. 

एक हिरवी मिरची एक हजार रुपये, अर्धा किलो टॉमॅटो लाखाचे
- बाबा राम रहिमचे मुख्यालय असलेल्या सिरसा येथील डेऱ्याची एकूण जमीन 700 एकर आहे. डेऱ्यात शेकडो एकर जमीनीवर राम रहिम शेती करायचा. 
- डेऱ्यात पिकवलेली फळे आणि भाजीपाला भक्तांना मनमनी किंमतीत विकला जात होता. भक्तही बाबांचा प्रसाद म्हणून अव्वाच्या सव्वा किंमतीला ते घेत होते.

एका पपईची किंमत 5000 रुपये
- बाबा राम रहिम डेऱ्यात येणाऱ्या भक्तांना एक हिरवी मिरची एक हजार रुपयांना देत होता. 
- वांगी ही सर्वच प्रांतात आवडीने खाल्ली जातात. वांग्यांच्या साइज नुसार बाबा त्यांची किंमत ठरवत होता. छोट्या आकाराची वांगी असतील तर एका वांग्यासाठी हजार रुपये आणि मोठ्या आकारांची वांगी त्यापेक्षा हजार-पाचशेने महाग विकली जात होती. 
 
पुढील स्लाइडमध्ये पाहा, बाबा कसा करायचा ब्रँडिंग...
बातम्या आणखी आहेत...