आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेलमधून निघाल्यानंतर हनीप्रीतने केली होती सिक्रेट मिटिंग, पाहुण्यासारखी मिळाली होती सिक्युरिटी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रोहतक : हरियाणा पोलीस बाबाच्या ज्या दत्तक मुलीला (हनीप्रीत) लुकआउट नोटीस देऊन तिचा शोध घेत आहेत, तिला तुरुंग प्रशासनाने 25 ऑगस्टला फतेहाबादला पाठवले होते. पंचकुला येथे बाबाला शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर हनीप्रीत बाबासोबत हेलिकॉप्टरमध्ये बसून सुनारिया जेलमध्ये आली होती. येथे जवळपास साडेचार तास राहिल्यानंतर तिला घेण्यासाठी चार लोक गाडीमध्ये आले होते. जेलच्या बाहेर पडल्यानंतर हनीप्रीतने एक सिक्रेट मिटिंग केली होती. तिने जेल प्रशासनाला लिहून दिले होते की, ती फतेहाबाद पोलीस स्टेशनचे कॉन्सटेबल विकाससोबत फतेहाबादला जात आहे. तिच्यासोबाबत झज्जर येथील जितेंद्र कुमार आणि रोहतकचे संजय हेसुद्धा कारमध्ये होते परंतु जेलच्या बाहेर आल्यानंतर हनीप्रीत काही तासातच गायब झाली.

पोलिसांनी आरोप फेटाळले
- फतेहाबादचे एसपी कुलदीप सिंह यांनी विकास नावाचा कोणी कॉन्स्टेबल नसल्याचे म्हटले आहे. यामुळे मोठे प्रश्न उपस्थित झाले आहे की, हनीप्रीतने पोलिसांना कशामुळे खोटे सांगितले. कदाचित तिला आधीपासूनच शंका होती, ज्याप्रमाणे बाबाच्या जवळ असलेल्या लोकांची चौकशी होत आहे तशीच तिचीही चौकशी होऊ शकते.
- पोलसांना हनीप्रीत देश सोडून गेल्याचेही संशय आहे. यामुळे  हनीप्रीतला लुकआउट नोटीस देण्यात आली आहे. हनीप्रीतचे शेवटचे लोकेशन जिंद बायपास येथे मिळाले आहे. त्यानंतर ती गायब झाली आहे.

जेलमधून निघाल्यानंतर हनीप्रीतने केली होती एक तास गुप्त बैठक
- झज्जरचे निवास जितेंद्र सिंह यांच्यानुसार "मी सात महिन्यांपूर्वी डेऱ्याच्या संपर्कात आलो. 25 ऑगस्टला संध्याकाळी मला आर्य नगर रोहतकचे निवास संजय यांचा फोन आला आणि जेलपर्यंत कार घेऊन जा असे सांगितले. ते म्हणाले की, तेथे वडील आले असून त्यांच्यासोबत काही लोक आहेत त्यांना सोडून परत ये."
- त्यानंतर मी गाडी घेऊन सुनारिया जेलपर्यंत गेलो. संजयकडे रिट्झ कर होती. फोर्ड जेलमध्ये जाण्यासाठी पोलसांनी व्हेरिफिकेशन केले. त्यावेळी एसपीसुद्धा तेथे आलेले होते.
- "व्हेरिफिकेशन करताना रोहतकचे संजय, हिसारचे वेदप्रकाश आणि मी सर्वानी एका कागदावर स्वाक्षरी केली. यासोबतच फतेहाबाद पोलीस स्टेशनचा एक कॉन्स्टेबल विकास तेथे होता. येथे हनीप्रीतनेलिहून दिले होते की, ती फतेहाबाद पोलीस स्टेशनचे कॉन्सटेबल विकाससोबत फतेहाबादला जात आहे. जेलमधून आम्ही साडेनऊ वाजता निघालो.
- त्यानंतर आम्ही हनीप्रीतला संजयच्या घरी सोडले. येथे आधीपासूनच एक इनोव्हा गाडी उभी होती. त्यानंतर हनीप्रीत त्या गाडीमध्ये बसून निघाली. गोहाना रोड स्थित वीटा मिल्क प्लांटपर्यंत आम्ही सोबत होतो. त्यानंतर त्यांनी मला गोहाना बायपासपासून परत जाण्यास सांगितले. त्यानंतर ते कुठे गेले हे मला काहीही माहित नाही."
बातम्या आणखी आहेत...