आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आपल्या जबाबदारीवर हनीप्रीतला जेलमधून घेऊन जाणारेही गायब, फोन आहे स्विच ऑफ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंचकुला - बलात्कारी बाबा गुरमीत राम रहीमला घेऊन फरार होण्याचा कट रचण्यात आला होता ज्यात त्याची दत्तक मुलगी हनीप्रीतचा समावेश होता. आता बाबा जेलमध्ये आहे आणि त्याची मानलेली मुलगी हनीप्रीत गायब आहे.सोबतच हरियाणा येथील कॉन्सटेबल विकास आणि इतर तीन लोकही गायब आहेत. या चौघांनी हनीप्रीतला सोबत घेऊन जाताना एका कागदावर नाव आणि मोबाईल नंबर लिहीले होते. यातील रोहतकचा संजय चावला समोर आला आहे तर इतर तीन जणांचे मोबाईल स्वीच ऑफ आहेत. चावलाचे म्हणणे आहे की हनीप्रीत रोहतकमध्ये 45 मिनिटे त्याच्या घरी थांबली होती. यानंतर बाकी लोकांसोबत हिस्राला निघून गेली. पोलिसांना रोहतक हिसार झज्जर येथून कसलीच माहिती मिळाली नाही. 
 
 कॉन्स्टेबल विकाससोबत चार जण हनीप्रीतला फोर्ड कारमध्ये घेऊन गेले होते. पोलिसांनी त्यावेळी गाडीचा नंबर नोट केला नाही. पंचकुला पोलिसांनी 
 हनीप्रीतविरुद्ध लुकआऊट नोटीस बजावली होती. पण तिचा अजूनही थांगपत्ता लागला नाही. पंचकुला पोलीस एसआयटी येथे तिला शोधत आहे. 
 
हनीप्रीतला पकडणे गरजेचे आहे कारण सर्वजण तिच्या इशाऱ्यावर काम करत होते. 
- कोर्टात रेपच्या आरोपात दोषी असलेल्या राम रहीमने कोर्टातून पळण्याचा प्रयत्न केला होता. या प्लानला सक्सेसफुल करण्यासाठी हनीप्रीतची मुख्य भूमिका होती. सर्वजण तिच्याच आदेशावर काम करत होते. 

- 25 ऑगस्टला रोहतकच्या सुनारिया जेलमधून निघताना हनीप्रीतने साईन केली होती आणि तिच्यासोबत चार जण होतते. ती ज्या कारमधून गेली त्याचा नंबरही कोणी नोट केला नाही. 
- यावेळी हनीप्रीतने लिहीले होते, मी हनीप्रीत इंसां पुत्री संत डॉ. गुरमीत राह रहीम  कॉन्स्टेबल विकास 3/783 फतेहाबादला निघाली आहे. यानंतर तिने साईन केले.
बातम्या आणखी आहेत...