आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dera Sacha Sauda Sant Ram Rahim Film Controversy

डेराचा ‘मेसेंजर ऑफ गॉड’ कदापि चालवू देणार नाही, शीख संघटनेचा पंजाबमध्ये इशारा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चंदिगड - सिरसाडेराचे संत गुरमित रामरहिम यांच्या वतीने १६ जानेवारी प्रदर्शित होणारा चित्रपट ‘मेसेंजर ऑफ गॉड’(एमएसजी) वरून वादाला तोंड फुटले आहे. शीख समाजातील काही जत्थेबंदींनी हा चित्रपट पंजाबमध्ये चालवू दिला जाणार नाही, असा इशारा दिला आहे.

चित्रपट तयार करण्यासाठी रामरहिम यांनी एवढे पैसे कोठून आणले, असा सवाल ऑल इंडिया शीख स्टुडंट फेडरेशनचे अध्यक्ष करनलसिंग पीर माेहंमद यांनी केला आहे. रविवारी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सेन्सॉर बोर्डाने चित्रपटावर देशभरात बंदी घातली पाहिजे, अशी मागणी अकाली दलाचे अमृतसरचे अध्यक्ष सिमरजितसिंग मान यांनी केली. चित्रपटात गुरुबाणीला धक्का बसला आहे. रामरहिम शीखांचा अवमान करत आहेत. यामागे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचाही हात असल्याचा आरोप मान यांनी केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डेऱ्याला भेट दिली होती. त्यामुळे हा आरोप करण्यात आला आहे; परंतु दमदमी टकसालचे प्रमुख हरनामसिंग धुमा यांनी मात्र याप्रकरणी काहीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.
वादाचे नेमके कारण काय?
सिरसाडेराप्रमुख तथा संत गुरमित रामरहिम यांच्या चित्रपटात रामरहिम यांनी स्वत:च मुख्य नायकाची भूमिका साकारली आहे. ६० दिवसांत तयार करण्यात आलेल्या चित्रपटातील गाणी रामरहिम यांनीच गायली आहेत. त्यांनी चित्रपटाचे चित्रीकरण सिरसा डेरा तसेच पालमपूर भागातही केले आहे.
चित्रपट पाहूनच काही सांगता येईल
अकालीदलाने मात्र त्यावर आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. चित्रपटाविषयी विचारल्यानंतर शिक्षणमंत्री आणि शिरोमणी अकाली दलाचे प्रवक्ते डॉ. दलजितसिंग चिमा म्हणाले, सध्या या मुद्द्यावर काही बोलता येणार नाही. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर काही बोलता येऊ शकेल.