आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डेरा समर्थकांच्या हिंसेची अशीही दहशत, आईने दीड KM स्ट्रेचरवर ओढला मुलीचा मृतदेह

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पीडितेचे आई आणि भाऊ... - Divya Marathi
पीडितेचे आई आणि भाऊ...
पटियाला - बाबा गुरमीत रामरहिमला बलात्कार प्रकरणी दोषी ठरवताच त्याच्या भक्तांचा उद्रेक पसरला. दिसेल त्या वाहनाला आग लावली आणि वाट्टेल त्याच्यावर हल्ला केला. या हिंसाचारात एवढी दहशत माजली होती, की एका मुलीचा मृत्यू झाल्यानंतर तिची बॉडी घरापर्यंत पोहचवण्यासाठी कुणीच तयार होत नव्हता. रुगणालयात तिचा मृत्यू झाला होता. कित्येक हाका मारल्यानंतरही कुणीही तिचा मृतदेह उचलण्यासाठी पुढे आला नाही. यानंतर मृत मुलीच्या आई आणि भावाने एका स्ट्रेचरवर तिचा मृतदेह ठेवून 1.5 किमी पर्यंत ओढून नेले.
 
 
काय आहे प्रकरण..?
- समाना येथे राहणारी मुलगी राजिंदरा हॉस्पिटलमध्ये अॅडमिट होती. उपचार सुरू असताना तिचा शुक्रवारी संध्याकाळी मृत्यू झाला. मुलीची आई आणि भाऊ संदीप त्यावेळी रुगणालयातच होते. डॉक्टरांनी त्या दोघांकडे मृतदेह सोपवला. 
- मुलीचा मृतदेह स्ट्रेचरवर ठेवून कुटुंबीय संध्याकाळी 6:30 वाजता रुग्णवाहिकेची वाट पाहत बाहेर थांबले होते. मात्र, बाबा रामरहिमच्या भक्तांचा धुमाकूळ सुरू असताना कुणीही आले नाही. उपस्थित असलेल्यांनी सुद्धा आपला जीव धोक्यात टाकण्यास नकार दिला. 
- घरी तर जाता येणार नाही. अशात मृतदेह नासू नये याची दखल घेऊन अखेर आईनेच आपल्या मुलीचा मृतदेह शवागारात घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. 
 

नंतर काय झाले?
- कुटुंबियांनी तिचा मृतदेह स्ट्रेचरवर तसाच ठेवून हायवे पर्यंत आणला. तरीही कुणीच मदतीसाठी आले नाही. शवागार त्या हायवेपासून 1.5 किमी दूर होते. तेथे कसे जाणार हा सर्वात मोठा प्रश्न होता. तेथे घेऊन जाण्यासाठी कुठलेही वाहन उपलब्ध नव्हते. 
- अखेर, स्ट्रेचरवर लादलेला मृतदेह आई आणि भावानेच आपल्या हातांनी ओढत पुढे नेला. तसेच दीड किमी पायी चालून तो शवागारापर्यंत आणला. कुटुंबीय शुक्रवारीच तिच्यावर अंत्यसंस्कार करणार होते. मात्र, बाबांच्या भक्तांनी घातलेल्या धुमाकूळ आणि हिंसाचारामुळे त्यांना तसे करता आले नाही.
बातम्या आणखी आहेत...