आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अरे बापरे! बलात्कारी बाबाच्या डेऱ्यात आढळले एवढे हत्यार, पोलिसांनी केली कडक तपासणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जप्त केलेल्या हत्यारांसह पोलिस. - Divya Marathi
जप्त केलेल्या हत्यारांसह पोलिस.
सिरसा (हरियाणा) - पोलिसांनी आतापर्यंत डेरा हेडक्वार्टरमधून डेऱ्याच्या नावाने इश्यू झालेले एकूण 67 लायसेन्सी हत्यारांपैकी 34 जप्त केले आहेत. डेराकडून जारी केलेल्या लायसेन्सी हत्यारांच्या सूचीनुसार अजूनही 33 हत्यारांचा शोध पोलिसांसाठी डोकेदुखी ठरलाय. दुसरीकडे, डेराच्या 10 हत्यारांची डिटेल न मिळाल्याने 10 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
असे आहे प्रकरण...
- डेरा प्रशासनाने शनिवारी संध्याकाळपर्यंत मुदत मागितली होती. वेळ पूर्ण झाल्यावर पोलिस पथकाने डेरा हेडक्वार्टरमध्ये जाऊन परिस्थितीचा अंदाज घेतला.
- डेरा सच्चा सौदा प्रशासनाकडून सिरसा पोलिसांत देण्यात आलेल्या सूचीनुसार 67 लायसेन्सी हत्यारांपैकी 27 पोलिसांत जमा करण्यात आले होते. यापैकी 14 रिव्हॉल्व्हर, 9 गन आणि 4 रायफल आहेत.
- स्टेशन इन्चार्ज दिनेश कुमार म्हणाले की 10 लायसन्स धारक हत्यारांचे लायसन्स रद्द झालेले आहेत. काही डेराप्रेमींकडेही परवानाधारक हत्यारे असू शकतात. त्यांची डिटेल येणे अजून बाकी आहे.
 
हायकोर्टाने दिले होते निर्देश
- 25 ऑगस्ट रोजी पंचकुलामध्ये डेरा प्रमुख गुरमित राम रहीम यांच्या ताफ्यात हत्यारांसोबत आलेल्या सिक्युरिटी गार्डवर पंजाब आणि हरियाणा हायकोर्टाने प्रश्न उपस्थित केले होते.
- सरकारला कोर्टाने 29 ऑगस्टला विचारले की कोणाच्या आदेशावरून खासगी गार्ड पंचकुलामध्ये शिरले. सोबतच प्रत्येक नामचर्चा घरातून हत्यार जप्त करण्याचे निर्देश दिले.
 
पुढच्या स्लाइड्समध्ये पाहा, बातमीशी संबंधित एक्स्क्लुझिव्ह फोटोज...
बातम्या आणखी आहेत...