समराला/लुधियाना - बाबा तुरुंगात गेल्यानंतर डेऱ्याकडून त्रस्त झालेले अनेक जण आता उघडपणे समोर येत आहेत. एकीकडे राम रहीमच्या जवळचे जाहीर म्हणतात की, बाबाला अफू आणि दारूचा मोठा शौकिन होता, तर दुसरीकडे 10 वर्षांच्या मुलाने पोलिसांना सांगितले की, डेऱ्यातील सेवादार त्याच्यावर अनैसर्गिक सेक्स करायचे. पोलिसांनी याप्रकरणी 2 आरोपींना अटक करून त्यांची तुरुंगात रवानगी केली आहे.
असे आहे पूर्ण प्रकरण...
- पंजाबच्या लुधियानाच्या जवळील समरालामध्ये निलो नहर पुलाजवळील राम रहीमच्या डेऱ्यात 10 वर्षीय बालकावर अत्याचार होत होते.
- तक्रारीवर पोलिसांनी डेऱ्याचा सेवादार जग्गी बाबा आणि छोटा मनी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मेडिकल रिपोर्टमध्येही अनैसर्गिक सेक्सची सत्यता समोर आली.
- पोलिसांनी सोमवारी दोघांना अटक करून कोर्टात हजर केले, तिथून त्यांची रवानगी तुरुंगात करण्यात आली.
सेवादार मारहाण करायचा, जिवे मारण्याची धमकी देऊन करायला अत्याचार...
- पीडित 10 वर्षांचा आहे आणि त्याने पोलिसांना सांगितले की, 1 वर्षांपूर्वी त्याचे आईवडील त्याला हरियाणा करनालच्या या डेऱ्यात सोडून गेले.
- तिथे अगोदर सेवादार छोटा मनी याने त्याच्याशी अश्लील चाळे करत होता. नंतर त्याच्यावर बळजबरी लैंगिक अत्याचार करायला लागला.
- चिमुकल्या ही बाबा दुसरा सेवादार जग्गी बाबाला सांगितली तर त्याने उलट त्यालाच काठीने मारहाण केली. मग अनेक दिवस दोघांनी मिळून त्याच्यावर अत्याचार केले.
- शेवटी एक दिवस त्याने आपल्या मित्रांना पूर्ण कहाणी सांगितली आणि मित्रांच्या कुटुंबीयांची त्याची मदत करून पोलिसांच्या कानावर हा प्रकार घातला.
- यानंतर पोलिसांनी डेऱ्यातील या प्रकाराचा तपास सुरू केला.
- पीडित चिमुकल्याने सांगितले की, त्याच्या आईवडिलांनी वर्षभरापूर्वीच त्याला डेऱ्यात सोडले होते. तो तेथे शिक्षण घेत होता.
पुढच्या स्लाइड्समध्ये पाहा, संबंधित आणखी फोटोज...