आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

क्रांतिकारकांची राष्ट्रीय सूची बनवा, क्रांतिकारकांच्या वारसांची नव्या लढ्याची घोषणा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रेवाडी - स्वातंत्र्य संग्रामात शहीद झालेल्या क्रांतिकारकांच्या वारसदारांनी शनिवारी हरियाणातील रेवाडी येथे अभूतपूर्व एकजूट दाखवत सरकारवर शहिदांचा अपमान केल्याचा घणाघाती आरोप केला. या वारसदारंनी सहा लाख शहिदांची सूची तयार करण्याची मागणी केली. स्वातंत्र्याचया ६७ वर्षानंतरही शहीद भगतसिंग, सुखदेव व राजगुरु यांना शहिदाचा दर्जा मिळाला नाही. पण संपूर्ण देश त्यांना शहीद मानतो. ब्रिटीश राजवटीत त्यांच्याबाबत वापरण्यात अालेले अवमानकारक विशषेणे हटवण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
रेवाडी येथे जैन पब्लिक सभागृहात झालेल्या कार्यक्रमात भगत सिंग, राजगुरू, सुखदेवसिंह व चंद्रशेखर आझाद यांचे वंशज उपस्थित होते. या कार्यक्रमात शहिदांच्या वंशजांनी सरकारला इशारा देताना सरकारने सहा लाख शहिदांची यादी तयार करण्याची मागणी केली. त्यांनी हे काम केली नाही तर ते स्वत: देशभर फिरून ६.२७ लाख गावांत सर्वेक्षण करतील व स्वातंत्र संग्रामात शहीद झालेल्या लोकांची यादी तयार करतील व ती केंद्राकडे पाठवण्यात येईल. ती यादी तपासून शहिदांची अधिकृत यादी जाहीर करावी, अशी मागणी त्यांनी केली. शहिदांच्या स्वप्नातील भारत घडवण्यासाठी नव्या लढ्याची घोषणा त्यांनी केली.
या आहेत मागण्या
{ भगतसिंग, सुखदेव, राजगुरु यांना शहिदांचा दर्जा द्यावा. त्यांच्याबाबतची अपमानजनक विशेषणे रद्द करावीत.
{ शहिदांच्या स्मृती एकत्रित करून राष्ट्रीय संग्रहालय बनवावे
{ देशातील सर्व सरकारी व खासगी शाळांमध्ये प्रत्येक वर्गात शहिदांचे धडे शिकवावेत
{ भारतीय चलनातील नोटांवर गांधीजींप्रमाणेच शहिदांची छायाचित्रे वापरावीत
आता तरी शहिदांचे योग्य वर्णन व्हावे
^इतिहासकारांनी माझे आजोबा भगतसिंगांना दहशतवादी ठरवले. जर ते अतिरेकी असते तर असेंब्लीमध्ये त्यांनी केलेल्या बॉम्बस्फोटात कुणी वाचले असते काय? तो स्फोट केवळ ब्रिटिशांना घाबरवण्यासाठी होता
यादुवेंद्र सिंह संधू, भगतसिंगांचे वंशज

^ आमच्या तरुणांना चित्रपट अभिनेत्यांचे वाढदिवस लक्षात राहतात. पण त्यांना शहिदांबाबत काही माहित नाही. यात त्यांचा दोष नाही. त्यांना जो इतिहास शिकवला जातोय तो सुनियोजित योजनेचा भाग आहे.
अनुज थापर, शहीद सुखदेव यांचे वंशज

^ यापेक्षा दुसरी कुठली शोकांतिका असू शकते की, सरकारी नोंदीमध्ये आजही शहिदांचे नाव दहशतवादी म्हणून नोंदवले आहे. त्यांना आतापर्यंत शहिदांचा दर्जा का दिला नाही? सरकारने उत्तर द्यावे.
सत्यशील राजगुरू, शहीद राजगुरूंचे वंशज

^ ही लढाई शहिदांना सन्मान मिळवून देऊनच थांबेल. आम्ही पूर्णपणे आशावादी आहोत. समाज व देशाला काही लोकांच्या भरोशावर सोडता येणार नाही. आम्ही खऱ्या हिरोंना समोर आणू व त्यांना सन्मान देऊ.
अमित आझाद, शहीद चंद्रशेखर आझाद यांचे वंशज
बातम्या आणखी आहेत...