आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हात नसलेल्या अब्दुल कादीरने 45 सेकंदांत पोहून पार केले 25 मीटर अंतर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अब्दुल कादिर - Divya Marathi
अब्दुल कादिर
रतलाम- येथील अब्दुल कादीर इंदौरी या नऊ वर्षीय मुलाला दोन्ही हात नाहीत, परंतु जिद्द चिकाटीच्या जोरावर तो उत्तम जलतरणपटू ठरला आहे. अब्दुलने अवघ्या 45 सेकंदांत 25 मीटर लांबीचा जलतरण तलाव पोहून पार केला. एका उच्चदाब वीज वाहिनीचा धक्का बसल्याने झालेल्या अपघातात 24 मे 2014 रोजी त्याला दोन्ही हात खांद्यापासून गमवावे लागले. त्याला वर्ष पूर्ण झाले. त्या दिवशी त्याने 25 मीटर पोहून सर्वांना चकित केले.
अब्दुल इंदौरी फ्रीस्टाइल, बॅकस्ट्रोक, फ्रेग स्टाइल, बटरफ्लाय आदी प्रकारांत पारंगत असून ताे पाण्यात पायाच्या साहाय्याने शरीराचे संतुलन साधतो. अपंगांच्या जलतरण प्रकारात राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध स्पर्धांमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करण्याची अब्दुलची इच्छा आहे. अब्दुल शिक्षणातही अव्वल असून त्याने या वर्षी 75 टक्के गुण मिळवले आहेत. आता तो पायाने लॅपटॉप चालवायला शिकतो आहे. अब्दुलने पोहण्याचा विक्रम केल्यानंतर त्याची आई फातिमा वडील हुसेन इंदौरींच्या डोळ्यात अश्रू तरळले.

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, अब्दुल कादिर इंदोरीचे फोटो...