आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भूत काढण्याच्या नावावर निष्पाप लोकांसोबत केले जाते असे अघोरी कृत्य

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महाराष्ट्रात येत्या हिवाळी अधिवेशनात जादूटोणा विरोधी विधेयक मंजुर केले जाणार आहे, असे महाराष्ट्र सरकारने सांगितले आहे. अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे प्रमुख नरेंद्र दाभोलकर यांनी हे विधेयक मंजुर व्हावे यासाठी खूप प्रयत्न केले. त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी बहुमताने हे विधेयक मंजुर करण्याचा निश्चय सरकारने केला आहे.
परंतु, आजही महाराष्ट्रातील काही भागांमध्ये भूत काढण्याच्या नावावर निष्पाप लोकांसोबत अघोरी कृत्य केले जात आहे. केवळ पुरुषच नव्हे तर महिला आणि लहान मुलांसोबतही अशा स्वरूपाचे किळसवाणे कृत्य अगदी खुलेआम केले जाते. भारतातील काही राज्यांमध्ये तर असे कृत्य हमखास दिसून येते. तेथे याला सामाजमान्यताही आहे. परंतु, वैचारिक बुद्धीला काही हे पटणारे नाही. त्यामुळेच कायदा करून अशा कृत्यांना आळा घालणे अत्यंत गरजेचे झाले आहे.
पुढील स्लाईड्सवर बघुयात भूत काढण्याच्या नावावर केले जाणारे अघोरी कृत्य