आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PICS: ज्या रस्ताने गेले आसाराम त्या रस्त्याचे घेतले भक्तांनी दर्शन, तर काहींना अश्रू झाले अनावर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जोधपूर - अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी जोधपूर तरूंगात अटक असलेले स्वयंघोषीत संत आसारामच्या भक्तांची संख्या अजूनही कमी झालेली नाही. त्यांच्यासाठी आसाराम आत्ताही तेवढेच पवित्र आहेत जेवढे ते पूर्वी होते. बुधवारी आसाराम यांना कोर्टात हजर करण्यात आले तेव्हा कोर्टाबाहेर तसेच तुरूंगाबाहेर त्यांच्या भक्तांची गर्दी जमली होती. आसारामला पाहून अनेकांना तर अश्रूही अनावर झाले, तर काहींनी ते ज्या रस्त्यावरून गेले तेथे डोके ठेवून त्या जमीनीला वंदन केले. एवढेच नव्हे तर काही समर्थकांनी पोलिस जीपच्या मागे धावत धावत जाऊन आसाराम यांना नमन केले.
आसाराम आणि त्यांचा मुलगा नारायण साई यांच्याविरोधात लैंगिक शोषणाची अनेक प्रकरणे समोर आली आहेत, मात्र त्यांच्या भक्तांची भक्ती तिळमात्रही कमी झालेली नाही. याचा प्रत्यय यापूर्वीही आला आहे. जोधपूरमध्ये यापूर्वीसुध्दा आसारामला अटक झाल्यानंतर त्यांच्या महिला समर्थकांना रडू कोसळले होते. आता तर आसाराम जेथेही जातात तेथे त्यांचे समर्थक पोहोचून त्यांच्या पदस्पर्श झालेल्या जमीनीला प्रणाम करतात. दूरूनच परंतु त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी त्यांचे भक्त तासनतास त्यांची वाट पाहात उभे राहातात. गुरूवारीसुध्दा असेच चित्र पाहायला मिळाले. महिला असो वा लहान मुले अथवा तरूण मंडळी प्रत्येकानेच आसारामला वाकून नमस्कार करत त्यांच्या भावना प्रकट केल्या.

पुढील स्लाईडवर पाहा, आसारामच्या भक्तांचे त्यांच्याबद्दलचे प्रेम व्यक्त करणारे फोटो...