आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dharavi Has Become An International Tourist Spots

धारावी झोपडपट्टी बनली 'आंतरराष्ट्रीय TOURIST प्लेस'; लाखो परदेशी पर्यटक देतात भेट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(मुंबईतील धारावी झोपडपट्टीत नृत्य करताना एक विदेशी तरूणी)

मुंबई - 500 एकरपेक्षा जास्त भागात पसरलेली धारावी ही आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी मानली जाते. मात्र ही झोपडपट्टी आज मुंबईतील प्रमुख पर्यटन स्थळांपैकी एक आहे. जगभरातून अनेक पर्यटक येथील राहणीमान, संस्कृतीचा, मानवी जिवनाचा अभ्यास करण्यासाठी येतात. धारावीमध्ये येणारा विदेशी पर्यटकांची संख्या कधी कधी गोवा कार्निवल आणि खजुराहोंची मंदिरे पाहाणार्‍या पर्यटकांच्या संख्येपेक्षा जास्त होते.

भारतात अनेक पर्यटन स्थळे आहेत, ज्यांना पाहाण्यासाठी लाखो विदेशी पर्यटक दरवर्शी भारतात येता. मात्र सध्या येथे स्ल टूरिझमने चांगलाच वेग घेतला आहे. स्लम टुरिझम भारतातील एक नवे पर्यटनस्थळ म्हणून उदयास आले आहे. यामध्ये सर्वात जास्त विदेशी पर्यटक मुंबईत असलेली जगातील सर्वात मोठी झोपडपट्टी पाहाण्यासाठी येतात. अनेक पर्यटक या घाणेरड्या झोपड्यांमध्ये राहणार्‍या लोकांच्या जीवनमानाचा अभ्यास करण्यासाठी मुंबईत येतात.
धारावीची ओळख संपूर्ण जगात पसरलेली आहे. बॉलिवूड ते हॉलिवूडपर्यंत या झोपडपट्टीचा प्रभाव दिसून येतो. मुंबईच्या मधोमध असलेल्या ह्या आशियाच्या सर्वात मोठ्या झोपडपट्टीचा भूभाग जवळपास 500 एकर एवढा आहे.
स्लमडॉग मिलेनियर चित्रपट आणि धारावी झोपडपट्टी
मुंबईची ही झोपडपट्टी सर्वात मोठी झोपडपट्टी मानली जाते. काही वर्षांपूर्वी याच भागावर आधारीत 'स्लमडॉग मिलेनियर' या चित्रपटाचे चित्रिकरण याच भागात झाले होते. या चित्रपटाला ऑस्कर पुरस्कारही मिळाला होता.

रोहीत शेट्टी म्हणाला -
शनिवारी संध्याकाळी बॉलिवूडचे सुप्रसिध्द चित्रपट निर्माता रोहित शेट्टी म्हणाला की, जेव्हा मी परदेशात जातो तेव्हा तेथील लोकं मला मुंबईतील या नव्या पर्यटन स्थळाबद्दल मला विचारतात. तेव्हा मला खुप वाईट वाटते.

धारावी काय आहे
मुंबईच्या माहिम स्टेशनच्या जवळच ही सर्वात मोठी झोपडपट्टी वसली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या आकडेवारीनुसार येथे जवळपास एक लाख लोक राहतात. असे म्हणतात की, सरकारी आकड्यांपेक्षा कित्येक पटीने जास्त लोक येथे राहातात. येथे संपूर्ण देशातील अनेक गरीब लोक आपल्या कुटुंबासमवेत राहतात. स्लम टूरिझम भारतातील एक नव्या पर्यटन स्थळाच्या रुपाने उदयास आले आहे, ज्याला पाहाण्यासाठी दररोज शेकडो विदेशी पर्यटक या झोपडपट्टीत येतात.
कसे राहतात लोक
असे म्हणतात, मुंबईच्या या झोपडपट्टीतील छोटछोट्या घरांमध्ये एका खोलीत जवळपास पाच ते सात लोक राहतात. आजूबाजूच्या भागात मोलमजदूरी करून हे लोक आपल्या गरजा भागवतात. येथे राहाणार्‍या लोकांचे जिवन एखाद्या नरकापेक्षा कमी नाही.
मोठमोठे उद्योगही चालतात
असे म्हणतात धारावीला मुंबईतील एक संगठीत संघटना चालवते. येथे प्रत्येक ती वस्तू मिळेल जी मुंबईमध्ये नाही मिळणार. येथे जवळच एक नाला आहे जो या लोकांचे जीवन अधिकच नरकात ढकलतो.

परदेशी पर्यटकांची पहिली पसंद
जनावरांप्रमाणे माणूस येथे कसा राहतो हे पाहण्याची उत्सूकता विदेशी पर्यटकांना धारावीत खेचून आणते. अनेक विदेशी कंपन्या धारावी फिरण्यासाठी विशेष पॅकेज आणि टूर गाईड सुध्दा या विदेशी पर्यटकांना पुरवतात.
पुढील स्लाईडमध्ये पाहा, विदेशी पर्यटकांचा धारावीतील उत्साह...