बाइकवेड्या धोनीने, बुधवारी रस्त्यावर हार्ले डेव्हिडसनची बाइक चालवत सर्वांनाच चकीत केले. धोनीकडे 20 पेक्षाही जास्त बाइक्स आहेत. या सर्व बाइक्सची किंमत 15- ते 20 लाखांपेक्षाही जास्त आहे. धोनी जेव्हा त्याच्या घरी रांचीला येतो तेव्हा तो या बाइकवर स्वार होतो. धोनीकडे कफेंड्रेट एक्स 132 हॅलकॅट, हार्ले डेविडसन फोटबाय, कावासकी निंजा, डूकाटी 1098 सारख्या अनेक महागड्या बाइक्स आहेत.
धोनी हार्ले डेव्हिडसन बाइक घेऊन दुपारी 2:30 वाजता, अंतराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर पोहोचला. त्या ठिकाणी तो तीन तास थांबला. धोनीने यावेळी विजय हजारे ट्रॉफीमध्ये सुरू असणाऱ्या मॅचही पाहिल्या. झारखंडने मॅच जिंकल्यावर धोनी खेळाडूंना भेटला. त्यांच्यासोबत गप्पा मारल्या. त्यांचा उत्साह वाढवला. त्यानंतर धोनी स्टेडीअमधून घरी गेला. धोनीने ही बाइक तीन वर्षांपूर्वी विकत घेतली आहे. या बाइकचा नंबर जेएच 01 डब्ल्यू 81 आहे.
काही दिवसांपूर्वीच कोलकत्यावरून आली आहे ही बाइक
धोनीच्या या बाइकमध्ये बिघाड झाल्याने दूरूस्तीसाठी ही बाइक कोलकत्याला पाठवण्यात आली होती. काही दिवसांपूर्वीच ही बाइक दूरूस्त होऊन रांचीला परत आली आहे.
धोनीची रेसिंग टिम
धोनीची रेसिंग टिम आहे हे खूप कमी लोकांना माहित आहे. धोनीच्या या टिमचे नाव एमएसडी आर-एन आहे. धोनीच्या या टिमने 21 व 22 जुलै 2013 रोजी झेक प्रजासत्ताक सोहळ्यातही सहभाग नोंदवला होता. बाइक रेसिंग टिम असणारा महेंद्रसिंह धोनी हा पहिलाच क्रिकेटर आहे. या रेसिंग टिमचा एमएसडी आर- एन चा कावासाकी जेडएक्स- 6 मध्ये समावेश करण्यात आला आहे.
जाहिरातीत दाखवला स्टंट
माही टिव्हीएस बाइकचा ब्रॅँड अॅम्बॅसिडर आहे. जयपूमधील एका जाहिरातीच्या शुटींगमध्ये धोनीने स्टंटही करून दाखवला होता. यामध्ये धोनी त्याच्या पूर्ण क्रिकेट टिमला बाइकवर आणत असल्याचे दाखवले होते.
बाइकवेडा आहे धोनी
धोनी क्रिकेटर असला तरी त्याला बाइकची आवड आहे. त्याला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तो बाइकवर स्वार होऊन रस्तावर उतरतो.
प्रत्येक वेळी खुश झाला, की चालवतो बाइक
मॅच जिकंली, की प्रत्येकवेळी धोनी बाइक चालवतो. माहीकडे 20 पेक्षाही जास्त बाइक्स आहेत ज्या तो त्याच्या मित्रांच्या घरी ठेवतो. मित्रही त्या बाईक चालवू शकत असल्याने कायम चांगल्या अवस्थेत राहतात.
पुढील स्लाइडवर वाचा धोनीच्या महागड्या बाइकविषयी...