आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : रांचीच्या रस्त्यांवर धावली धोनीची BULLET, नंबर प्लेट होती महाराष्ट्राची

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रांची - टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी सोमवारी सकाळी रांचीतील रस्त्यांवर बुलेटवर फिरताना दिसला. यावेळी त्याच्यासोबत एकही सुरक्षा रक्षक नव्हता. धोनी मेहंद कलरच्या बुलेटवर रिंगरोड आणि बायपासवर फिरत होता. त्याच्यासोबत सुरक्षा रक्षक नसल्यामुळे अनेक चाहते त्याच्या मागे चालले होते. त्याच्या सुरक्षेसाठी तैनात एक्सॉर्ट टीमला ही तो बुलेटवर बाहेर निघाला असल्याचे माहित नव्हते. त्याच्या निवासस्थानाजवळ असलेल्या अरगोडा पोलिस स्टेशनलाही त्याच्या बुलेट फेरीची माहिती नव्हती. विशेष म्हणजे, धोनीला 'वाय' दर्जाची सुरक्षा देण्यात आलेली आहे.
रांचीमधील हरमू येथे धोनीचे निवासस्थान आहे. येथून सकाळी जवळपास सात-आठ वाजेच्या दरम्यान तो बाहेर पडला आणि दहा वाजता परत आला. यावेळी तो सिमलिया येथील फार्महाऊसवर देखील जाऊन आला. फार्महाऊसला जाण्याआधी धोनी बहिणीच्या घरी गेला. तेथे त्याने भाऊजी गौतम गुप्ता यांची भेट घेतली. धोनीने कानात इअरफोन आणि हेल्मेट घातलेले होते. विशेष म्हणजे धोनी ज्या बुलेटवर रांचीच्या रस्त्यावरुन फिरत होता, त्या बुलेटची पासिंग महाराष्ट्रातील होती.