आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ही आहे सुपर MOM, बहिणीच्या मृत्यूनंतर तिनेे दुप्पट वयाच्या भाऊजीसोबत थाटला संसार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिसार- 24 वर्षीय झोया खा, सुपर मॉम. आज प्रत्येक शहरात त्यांचे फॅन आहेत. पण दोन वर्षांपूर्वीपर्यंत त्यांना शेजारीही ओळखत नव्हते. अत्यंत कठीण परिस्थितीत त्यांचे आयुष्य जात होते. मोठ्या बहिणीचा अचानक मृत्यू झाला. त्यामुळे तिच्या मुलांच्यासाठी स्वतः दुप्पट वयाच्या भाऊजींशी विवाह करावा लागला.

दोन मुली आणि एका मुलाची जबाबदारी अंगावर पडली. 18 वर्षीय जिया यांचे जीवन कौटुंबीक बंधनात अडकले. पण स्वतःमधील वेगळेपणा सिद्ध करण्याची नशा त्यांना होती. तेव्हाच डीआयडी सुपर मॉमच्या ऑडिशनसाठी टीम देहरादूनला आल्याचे त्यांना कळले. पतीला ऑडीशनसाठी विचारले. नकार आला तरी परभाव स्वीकारला नाही. पतीला तयार केले आणि ऑडिशन दिल्यानंतर जीवनच पालटून गेले.

एका कार्यक्रमासाठी आलेल्या झोया यांनी आपल्या संघर्षमय जीवनाची गाथा सांगितली. एखाद्या गोष्टीसाठी तुम्ही पूर्ण मनापासून प्रयत्न केला तर ती गोष्ट तुम्हाला नक्की मिळते, असे त्या म्हणतात. प्रत्येकामध्ये काही तरी टॅलेंट असते फक्त ते समजायला हवे. मला लहानपणापासूनच डान्स करायला आणि पाहायला आवडायचे. पण गरीब कुटुंबातील असल्याने शिकायचे कसे हा प्रश्न होता. त्यामुळे केवळ टिव्हीवरच पाहायला मिळायचे. लग्नाचे वय नेमकेच झाले तेव्हा मोठ्या बहिणीचा मृत्यू झाला. मग मावशीपेक्षा मुलांना कोण चांगले सांभाळणार असा निर्णय कुटुंबात झाला. मलाही तो मान्य करावा लागला. त्यामुळे विवाह केला आणि देहराडूनला आले.

असे बदलले आयुष्य
झोया म्हणाल्या की, डीआयडी सुपर मॉम सीझनसाठी पहिले ऑड़िशन दिले. देहराडूनमध्ये माझे सलेक्शन झाले आणि पुढच्या राऊंडसाठी दिल्लीला बोलावण्यात आले. तेथे गेले तेव्हा थोडी नर्व्हस होते. पण आत्मविश्वासही होता. परफॉर्मंस सुरू होताच नर्व्हसनेस अचानक गायब झाला. तेथे निवड झाली आणि मुंबईचे तिकिट मिळाले. त्यानंतर संपूर्ण आयुष्यच पालटून गेले.

फॅन्सची मोठा आनंद दिला
आधी मला कोणीही ओळखत नव्हते. अगदी शेजारीही नाही. पण यश मिळाले आणि त्यामुळे एक वेगळी ओळखही मिळाली. नाव, पैसा सोबतच मिळाले. तसेच फॅन्सचे प्रेमही मिळाले. माझ्यावर लोकांचे असलेले प्रेम पाहून खूप आनंद होतो.

टॅलेंट वाया घालवू नका...
झोया खान महिलांना संदेश देताना सांगतात की, गरीबी किंवा इतर घरगुती कारणांमुळे आपले टॅलेंट वाया घालवू नका. विरोध झाला तरीही धैर्य ठेवा आणि आपले लक्ष्य गाठण्यासाठी जीवाच्या आकांताने प्रयत्न करा. तुम्हाला एक दिवस यश नक्कीच मिळेल.

पुढील स्लाइड्सवर पाहा, या सुपर मॉम झोया खानचे काही PHOTOs

(Pls Note-
तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...