आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Didnt Mean Hindustan Is For Hindus Only Assam Guv PB Acharya

मुस्लिमांविषयी आसाम राज्‍यपालांनी केलेल्‍या वक्तव्याने वादंग

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गोहत्ती - आसामचे राज्यपाल पी. बी. आचार्य यांनी एका पुस्तक प्रकाशन सोहळ्यात केलेल्या एका वक्तव्याने वादंग माजले आहे. हिंदुस्थान हा हिंदुंसाठीच असल्याचे सांगत भारतातील मुस्लिम कोठेही जाण्यास स्वतंत्र असल्याचे त्यांनी म्हटले हाेते. दरम्यान, त्यांच्या या वक्तव्यानंतर काँग्रेसने जोरदार टीका केली असून संघ व भाजपच्या फूट पाडणाऱ्या धोरणांचाच हा एक भाग असल्याचे म्हटले आहे.
भारतात इतर देशांतील हिंदुंनी येऊन राहणे काहीही चुकीचे नाही, असेही आचार्य यांनी म्हटले आहे. भारतातील मुस्लिमांनी इतर समाजाप्रमाणेच भारतात राहावे. अन्यथा त्यांनाही इतर देशांत जाण्याचे स्वातंत्र्य आहे, अशा आशयाचे विधान त्यांनी केले होते. यापैकी बरेच मुस्लिम पाकिस्तानमध्ये गेले असल्याचेही त्यांनी नमूद केले होते.
पाकिस्तान आणि बांगलादेशमध्ये छळ होत असलेल्या अल्पसंख्यांक समुदायाला भारतात आश्रय देण्याबाबत केंद्र सरकारने काढलेल्या अधिसूचनेबाबत विचारलेल्या एका प्रश्नावर आचार्य म्हणाले होते की, आम्ही प्रत्येकाला सुरक्षित आश्रय देतो. भारत सर्वाधिक सहिष्णू देश आहे.बाहेर देशांतील हिंदू येथे येऊन राहण्यास उत्सुक असतील तर त्यात काही वावगे नाही. मात्र त्यांना सामावून घेणे हा मोठा प्रश्न आहे.
दरम्यान, आपल्या वक्तव्यावरून वादंग उठल्याचे लक्षात आल्यानंतर आचार्य यांनी रविवारी याबाबत खुलासा केला. ते म्हणाले, मुस्लिमांसह सर्वच मूळ भारतीय वंशाच्या लोकांचे आपल्या देशात स्वागत झाले आहे. कोणत्याही धर्माचा मनुष्य असो, त्याच्या धर्मावरूनच एखाद्या देशात त्याच्यावर अत्याचार होतात. एखादा भारतीय ख्रिश्चन माणसावर पाकिस्तानात अन्याय झाला तर त्यालाही भारतातच यावे लागते. तो कुठे जाणार? भारतीय ख्रिश्चन, भारतीय जैन, भारतीय बौद्ध किंवा भारतीय हिंदू या सर्वांना अशा परिस्थितीत भारतातच यावे लागते, असे त्यांनी नमूद केले.