आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केवळ हाडांचा सापळा उरला होता युवक, छातीवर लिहिले होते \'I Love U\'

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
या अवस्‍थेत आढळली होती युवकाची डेडबॉडी. त्‍याच्‍या छातीवर I Love U लिहिलेले होते. - Divya Marathi
या अवस्‍थेत आढळली होती युवकाची डेडबॉडी. त्‍याच्‍या छातीवर I Love U लिहिलेले होते.
ग्‍वालैर- 3 तास एका युवकाचा मृतदेह रस्‍त्‍याशेजारी पडलेला होता. लोकांना वाटले तो दारुडा आहे. काही लोकांनी त्‍याला जागे करण्‍याचाही प्रयत्‍न केला. मात्र तो हललाही नाही. नंतर काही लोकांनी त्‍याची नाडी तपासली तेव्‍हा त्‍यांच्‍या ध्‍यानात आले की, युवकाचा मृत्‍यू झाला आहे. त्‍यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी युवकाचा मृतदेह पोस्‍टमार्टमसाठी पाठवला आहे. या युवकाच्‍या छातीवर  I Love U असे लिहिलेले आहे. अनेकांना वाटते की, या युवकाचा प्रेमभंग झाला असावा. म्‍हणून त्‍याची अशी अवस्‍था झाली. पोलिस आता या प्रकरणाचा तपास करत आहे. 

काय आहे प्रकरण? 
- मंगळवारी दुपारी एक युवक फुलबाग चौकाजवळ एका रस्‍त्‍याशेजारी पडलेला लोकांना दिसला. सुरुवातीला लोकांना वाटले की, एखादा बेवडा पडलेला असावा. त्‍यामुळे कोणीही त्‍याच्‍याकडे लक्ष दिले नाही. 
- काही जणांनी त्‍याला हलवून पाहिले. मात्र त्‍याने कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्‍याच्‍या छातीवर  I Love U लिहिलेले लोकांना दिसले. त्‍याची नाडी तपासली असता तो मृत असल्‍याचे लोकांना लक्षात आले. 
- नंतर पोलिसांना याबाबत माहिती देण्‍यात आली. युवकाचा मृत्‍यू नेमका कशामुळे झाला. याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाही. 
- प्रथमदर्शनी पाहिल्‍यास युवक भिकारी आहे, असे वाटते. मात्र ज्‍या पद्धतीने त्‍याच्‍या छातीवर I Love U लिहिलेले आहे. त्‍यावरुन त्‍याच्‍या मृत्‍यूचे खरेच असे काही कारण आहे का? याबाबत पोलिस तपास करत आहे. 
 
युवकाची ओळख पटावी म्‍हणून पोलिसांचा तपास सुरु 
- पोलिसांनी माहिती‍ दिली आहे की, 'युवकाची ओळख अद्याप होऊ शकलेली नाही. त्‍याची कोणी हत्‍या केली की, तो आपल्‍याच दुर्दशेमुळे मृत्‍यू पावला याचे उत्‍तर पोस्‍टमार्टमचा रिपोर्ट आल्‍यावरच मिळेल.' 
- पोलिसांनी सांगितले की, 'आतापर्यंत तीन ते चारजण त्‍याची ओळख पटवण्‍यासाठी आलेले आहेत. मात्र त्‍यांनी केवळ त्‍याला फुलबाग चौकातील परिसर आणि साई बाबा मंदिराजवळ भिक मागताना पाहिलेले आहे. याव्‍यतिरिक्‍त त्‍याच्‍या कौंटुबिक पार्श्‍वभूमीबद्दल कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही.' 

पुढील स्‍लाइडवर पाहा, संबंधित फोटोज... 
 
 
बातम्या आणखी आहेत...