आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बिहारमध्‍ये विहिरीतून निघत आहे डिझेल, जिल्‍हा प्रशासानाने उपशावर घातली बंदी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाटणा - बिहारमधील गंगोबिगहा (जि. गया) येथील एका विहिरीमधून पाण्‍याऐवजी डिझेल निघत असून, ते भरून नेण्‍यासाठी नागरिकांनी गर्दी केली. पण, याची माहिती मिळताच जिल्‍हा प्रशासनाने ही विहीर ताब्‍यात घेतली असून, या ठिकाणी उपशावर बंदी घातली आहे. शिवाय विहिरीभोवती पोलिस बंदोबस्‍तही ठेवला आहे.

काय आहे प्रकरण...
> गया जिल्‍ह्यातील रामपूर पोलिस ठाण्‍याअंतर्गत येणाऱ्या गंगोबिगहा परिसरातील विहिरीतून डिझेल निघत असल्‍याचे सर्वात अगोदर रंजीत कुमार नावाच्‍या युवकाला कळाले.
> त्‍याने स्‍थानिक नागरिकाच्‍या मदतीने ते विहिरीतून बाहेर काढले असता सर्व जण आवाक् झाले.
> ही बातमी परिसरात वाऱ्यासारखी पसरली.
> अनेकांनी डिजेल घरी नेण्‍यासाठी गर्दी केली.
> मात्र, जिल्‍हाधिकाऱ्यांच्‍या आदेशाने महसूल विभागाने ही विहीर ताब्‍यात घेतली आहे.
खूप दिवसांपासून येत होती तेलाची दुर्घंधी
या बाबत एसडीओ विकास कुमार जयस्‍वाल म्‍हणाले, याची माहिती आम्‍ही आयओसीला दिली असून, विहिरीभोवती सुरक्षा वाढवली आहे. दरम्‍यान, या परिसरातील याच विहिरीतून नव्‍हे तर इतरही कूपनलिकेच्‍या पाण्‍याला अनेक दिवसांपासून तेलाची दुर्गंधी येत असल्‍याचे नागरिकांनी सांगितले.
पुढील स्लाइड्सवर पाहा, संबंधित फोटोज...
बातम्या आणखी आहेत...