आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Differences Have Cropped Up Between The Father And Wife Of Slain Kunda DSP Zia Ul Haq

डीएसपी झ‍ियांच्या कुटूंबातील वाद चव्हाट्यावर; पत्नीने बळकावली नुकसान भरपाईची रक्कम!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लखनौ- उत्तर प्रदेशातील प्रतापगड जिल्ह्याचे पोलिस उपअधीक्षक (डीएसपी) झिया उल हक यांच्या हत्येनंतर त्यांच्या कुटूंबियांना सरकारतर्फे नुकसान भरपाई देण्यात आली होती. आता याच रकमेवरून शहीद झिया यांच्या कुटूंबातील वाद चव्हाट्यावर आला आहे.

शहीद झि‍यांच्या वडिलांनी आरोप केला आहे की, त्यांची सून अर्थात झियांची पत्नी परवीन आझाद यांनी सरकारतर्फे मिळालेली नुकसान भरपाईची संपूर्ण रक्कम बळकावली आहे. या रकमेतून तिने झियांच्या आई-वडिलांना काहीच दिलेले नाही.

उत्तर प्रदेशचे मुख्यंमत्री अखिलेश यादव यांच्या हस्ते झिया उल यांची पत्नी परवीन आणि त्यांचे वडील यांना 25-25 लाख रुपयांचे दोन धनादेश देण्यात आले होते. तसेच झियांच्या कुटूंबाती पाच सदस्यांना योग्यतेनुसार सरकारी नोकरी देण्याचेही आश्वासन यादव यांनी यावेळी दिले होते.

दुसरीकडे परवीनने गुरुवारी दोनदा मुख्‍यमंत्री अखिलेश यादव यांच्या फोन करून संपर्क करण्‍याचा पर्यंत केला होता. परंतु संपर्क होऊ शकला नाही. कुंडा येथील झियांच्या घरात काही दागिने, पुस्तके तसेच किंमती साहित्य आहे. ते आणण्यासाठी परवीनची कुंडा येथे जायचे आहे. एवढेच नाही तर तिने सरकारकडे मागणी केली आहे की, तिला कुंडा येथे जाण्याची परवानगी देण्यात यावी तसेच तिला सुरक्षाही उपलब्ध करून देण्यात यावी.

दरम्यान, प्रतापगड डीएसपी झिया उल हक यांच्या हत्या झाली होती. याप्रकरणी प्रधान नन्‍हे यादवांचा मुलगा योगेंद्र उर्फ बबलू आणि भाईला सीबीआय पथकाने चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, एफआयआर दाखल केल्यानंतर सीबीआय झिया उल हक यांची गायब झालेली पिस्टूलचा शोध घेत आहे. याबाबत गावातील लोकांनाही नोटीस पाठवून त्यांना त्यांचे परवानाधारक शस्त्र पोलिस ठाण्यात जमा करण्‍यात सांगण्यात आले आहे. बबलूकडून या हत्येबाबत महत्त्वाची माहिती मिळण्याची सीबीआयला अपेक्षा आहे.