आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Digital Kerala: 33 Million People Took The E Education

केरळ देशातील पहिले डिजिटल राज्य, ३३ लाख लोकांनी घेतले ई-एज्युकेशन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तिरुवनंतपुरम - मोदी सरकारने वाजतगाजत डिजिटल इंडियाची घोषणा केली. मात्र, केरळने याच वेळी देशातील पहिले डिजिटल राज्य होण्याचा मान पटकावला. शनिवारी केरळला देशातील पहिले डिजिटल राज्य म्हणून अधिकृतरीत्या मान्यता मिळाली. मुख्यमंत्री आेमान चांडी यांनी ही घोषणा केली.

मात्र, हे कसे शक्य झाले? वर्षभरापूर्वीच केरळला डिजिटल राज्य म्हणून विकसित करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. यासाठी अक्षय ऊर्जा स्रोतांचा विकास, आयटी शाळांचा विकास, मूलभूत सुविधांसाठी तंत्रज्ञानाचा वापर अशा विविध स्तरांवर काम सुरू झाले. कुटुंबातील एका सदस्याला अक्षय ऊर्जा प्रकल्पाअंतर्गत डिजिटल साक्षर करण्यात आले. आतापर्यंत ७५ लाख कुटुंबातील ३३ लाख सदस्यांना ई-शिक्षित करण्यात आले आहे. आयटी स्कूल प्रकल्पाअंतर्गत १२, ६०० शाळांतील ३९ लाख मुलांना संगणक साक्षर करण्यात आले. लवकरच सर्व पुस्तके डिजिटलाइज्ड करण्यात येतील. शाळांमध्ये फळा राहणार नाही व मुलांच्या दप्तरात पुस्तकांचे आेझेही नाही. सर्व शिक्षण ऑनलाइन. पुढच्या टप्प्यात प्रत्येक संस्थेमध्ये वायफाय हॉटस्पॉट लावण्यात येतील. संपूर्ण राज्यात मोबाइल शासन सुरू करण्याची योजना आहे. स्टार्टअप व्हिलेजचे अध्यक्ष संजय विजय कुमार यांनी केरळच्या तांत्रिक प्रगतीची माहिती दिली. केरळ १००% साक्षर आहे. १००% जनता स्मार्टफोन वापरते. १००% इंटरनेट पोहोच असणारे पहिले राज्य आहे. सरकारी देणी चुकती करण्यासाठी क्लाउड इनॅबल्ड राज्यांत केरळ दुसऱ्या स्थानी आहे. ३.३ कोटी लोकसंख्येच्या या राज्यात ३.१ कोटी लोकांकडे मोबाइल कनेक्टिव्हिटी आहे. इंटरनेटचा वापरही सर्वाधिक आहे. २०% कुटुंबे ब्रॉडबँडशी, तर १५ % मोबाइलवरून इंटरनेटशी जोडले गेले आहेत. दहा वर्षांपूर्वी टेलिकॉम कंपन्यांना ऑप्टिकल फायबर केबलचे जाळे उभारण्याची मंजुरी देण्यात आली होती. या दूरदर्शी निर्णयामध्येच केरळच्या आजच्या यशाचे गमक आहे.
देशात प्रथमच २,३०० सामान्य सेवा केंद्रे.
‘आधार’च्या माध्यमातून ९९% लोकांचे केले जाणार नामांकन.
९९% लोकांची नोंदणी.
ई-डिस्ट्रिक्टच्या माध्यमातून झाले १.४ कोटी प्रमाणपत्रांचे वितरण.