आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाळेतील मित्रांची कमाल, Jio सिमने तयार केले डिजिटल लॉक; जाणून घ्या कसे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाराणसी - पंतप्रधान नरेंद्र मोदींंनी भारतीयांना डिजिटल होण्याचे आवाहन केले आहे. त्यांच्या मतदारसंघातील विद्यार्थ्यांनी जिओ सिमचा वापर करुन फक्त 80 रुपयांमध्ये डिजिटल लॉक तयार केले आहे. यासाठीचे रॉ मेटरियल म्हणजे टाकाऊ वस्तू आहेत. असे लॉक तुम्हीही तयार करुन घर आणि लॉकर सुरक्षित करु शकता.
जाणून घ्या कसे...
- वाराणसीमधील आर्यन इंटरनॅशनल शाळेतील अतुल, प्रियांशु आणि उज्ज्वल या तीन मित्रांनी डिजिटल लॉक तयार केले आहे.
- विद्यार्थी म्हणाले, आम्ही खराब झालेल्या जिओ सिमचा उपयोग प्रयोगासाठी केला.
- यात इंटरनेटचा वापर केलेला नाही.
- ज्या प्रकारे हॉटेलच्या लॉकमध्ये चावी टाकल्यानंतर लाइट लागतात आणि दरवाजा उघडतो. त्याच पद्धतीने आम्ही सिमचे कोडिंग चेंज करुन त्याचा डिव्हाइस सारखा वापर केला आहे.
- सिमचा उपयोग करुन आम्ही डिजिटल लॉक तयार केले, जे अतिशय स्वस्त आहे. विद्यार्थी म्हणाले, अशा प्रकारचे लॉक बाजारात आहेत मात्र ते फार महागडे आहेत.
- सिम स्लॉट डिव्हाइसमध्ये फक्त सिम टच केल्यानंतर तुमच्या घराचा दरवाजा लॉक होईल. लॉक उघडण्यासाठीही सेम प्रोसेस आहे. सिम पुन्हा स्लॉटमध्ये टच केले की दरवाजा उघडेल.

विद्यार्थ्यांवर कौतूकाचा वर्षाव

- बीएचयू आयआयटी प्रोफेसर पी. के. मिश्रा यांनी विद्यार्थ्यांचे कौतूक केले.
- त्यांचे म्हणणे आहे की असे लॉक बाजारात आहेत परंतू ते महागडे आहे.
- शाळकरी मुलांचा प्रयत्न चांगला आणि स्वस्तातला आहे.
पुढील स्लाइडमध्ये जाणून घ्या कसे तयार केले डिजिटल लॉक..

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...