आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केरळमध्ये शाळांत डिजिटल अभ्यास, विद्यार्थ्यांना 4 भाषांत मोफत पुस्तक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तिरुवनंतपुरम - केरळमध्ये दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी पहिली ते सातवीपर्यंत सर्व शाळांत आता डिजिटल अभ्यास सुरू होत आहे. यासाठी प्राथमिक शाळांत संगणक लॅब आणि स्मार्ट वर्ग तयार करण्यात आले आहेत. या विद्यार्थ्यांना चार भाषांत ऑनलाइन पुस्तके मिळतील. यात विद्यार्थ्यांना मदतीसाठी विशेष साॅफ्टवेअर तयार करण्यात आले आहे. सोबत शिक्षकांना खास प्रशिक्षणही देण्यात आले आहे.
 
ही योजना १ जूनपासून सुरू होत असलेल्या आगामी शैक्षणिक सत्रापासून सुरू होत आहे. या योजनेत प्राथमिक व माध्यमिक अशा ९२७९ शाळांचा समावेश करण्यात आला आहे. ८वी ते १२वीसाठी ही योजना २००५पासूनच लागू करण्यात आली आहे. यासाठी इयत्ता ५वी ते ७वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी ‘अॅट द रेट विद्या’ हे सॉफ्टवेअर लाँच करण्यात आले आहे. यात विद्यार्थ्यांना क्रमिक पुस्तके आणि प्राथमिकच्या विद्यार्थ्यांसाठी ऑपरेटिंग सिस्टिम व डीव्हीडीचा समावेश आहे. ही पुस्तके मल्याळम, इंग्रजी, तामिळ आणि कन्नड या भाषांत उपलब्ध असतील. यासाठी सर्व शाळांना एक डीव्हीडी दिला जाईल. यात आवश्यक सर्व सॉफ्टवेअर असतील. ही पुस्तके वाचण्याच्या कामी या सॉफ्टवेअरची मदत होईल. यासाठी सर्व प्राथमिक शिक्षकांना खास प्रशिक्षण देण्यात आले आहे. राज्याचे शिक्षणमंत्री रवींद्रनाथ यांनी ही माहिती दिली. या शिक्षणपद्धतीमुळे केरळ देशपातळीवर शिक्षणाच्या दृष्टीने अादर्श राज्य ठरले अाहे.

४५,००० वर्गखोल्या झाल्या डिजिटल
केरळमध्ये ८वी ते १२वीपर्यंत सुमारे ४५००० वर्गखोल्या पूर्वीच डिजिटल करण्यात आल्या आहेत. यानुसार अभ्यासक्रमाची पुस्तके, अध्यापन, प्रॅक्टिकल, शिक्षकांचे प्रशिक्षण, देखरेख तसेच मूल्यांकन यात अपग्रेड करण्यात आले आहे. ८वी ते १२वीपर्यंतच्या वर्गात आयसीटीचा वापर करून ई-गव्हर्नन्स कार्यान्वित केले जात आहे.
बातम्या आणखी आहेत...