आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Digvijay Connect Bihar Bomb Blasts With Narendra Modi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

स्‍फोटांचा मोदींशी संबंध जोडणा-या दिग्विजय सिंहांना पाठवा मनोरुग्‍णालयात, भाजपची टीका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाटणा- बुद्धगयेतील प्राचीन महाबोधी मंदिरात रविवारी झालेल्‍या साखळी बॉम्‍बस्‍फोटांप्रकरणी तपास यंत्रणा अद्यापही अंधारातच आहेत. तर दुसरीकडे स्‍फोटांवरुन राजकारण सुरु झाले आहे. कॉंग्रेसचे सरचिटणीस दिग्विजय सिंह यांनी या घटनेचा गुजरातचे मुख्‍यमंत्री नरेंद्र मोदी यांच्‍याशी संबंध जोडला आहे. दरम्‍यान, बॉम्‍बस्‍फोटांप्रकरणी राष्‍ट्रीय तपास संस्‍थेने (एनआयए) एकाला अटक केली आहे. त्‍याची कसून चौकशी सुरु आहे.

दिग्विजय सिंह यांनी ट्विट केले, की 'मोदींच्‍या जवळचे अमित शहा अयोध्‍येत जाऊन राम मंदिराचा मुद्दा काढतात. मोदी आपल्‍या भाषणात नितीशकुमार यांना धडा शिकविण्‍याबाबत बोलतात. याच्‍या दुस-याच दिवशी बुद्धगयेत बॉम्‍बस्‍फोट होतात. या गोष्‍टींचा आपसात काही संबंध आहे का? मला ठावूक नाही. एनआयएचा तपास पूर्ण होऊ द्या.'

दिग्विजय सिंह यांच्‍या वादग्रस्‍त ट्विटनंतर भाजपकडूनही प्रतिक्रीया देण्‍यात आली आहे. दिग्विजय सिंह यांना मनोरुग्‍णालयात पाठविण्‍याचा सल्‍ला भाजपच्‍या नेत्‍यांनी दिला आहे.

पुढील स्‍लाईडमध्‍ये वाचा नितीशकुमारांनी केलेली टीका...