आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

माजी मंत्री दिलीपसिंह जूदेव यांचे निधन, शोकाकूल पत्‍नीचा आत्‍महत्‍येचा प्रयत्‍न

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रायपूर- भारतीय जनता पक्षाचे ज्‍येष्‍ठ नेते, माजी केंद्रीय मंत्री आणि बिलासपूरचे खासदार दिलीपसिंह जूदेव यांचे दिर्घ आजारामुळे निध्‍णन झाले. ते 64 वर्षांचे होते. गुरगाव येथील मेदांता रुग्‍णालयात त्‍यांच्‍यावर उपचार सुरु होते. त्‍यांच्‍या निधनामुळे शोकाकूल झालेल्‍या पत्‍नीने झोपेच्‍या गोळ्या खाऊन आत्‍महत्‍या करण्‍याचा प्रयत्‍न केला. त्‍यांना दिल्‍लीतील राम मनोहर लोहिया रुग्‍णालयात दाखल करण्‍यात आले. दिलीपसिंह जूदेव यांचे पार्थिव गुरुवारी सायंकाळपर्यंत जशपूर येथे नेण्‍यात येणार आहे. तिथे त्‍यांच्‍यावर राजकीय सन्‍मानात अंत्‍यसंस्‍कार करण्‍यात येतील.

जूदेव यांना दिर्घ कालावधीपासून यकृत आणि मुत्रपिंडाचा आजार होता. दोन आठवड्यापूर्वी त्‍यांना मेदांता रुग्‍णालयात दाखल करण्‍यात आले होते. त्‍यानंतरही त्‍यांची प्रकृती खालावतच गेली. दोन दिवसांपासून त्‍यांचे बोलणेही बंद झाले होते. भाजपचे राष्‍ट्रीय अध्‍यक्ष राजनाथ सिंह, सरचिटणीस जगत प्रकाश नड्डा यांच्‍यासह इतर नेत्‍यांनी जूदेव यांची रुग्‍णालयात भेट घेऊव प्रकृतीची विचारपूस केली होती. अखेर जूदेव यांनी बुधवारी सायंकाळी 6 वाजता अखेरचा श्‍वास घेतला.

जूदेव यांच्‍या मोठ्या मुलाचे 2012 मध्‍ये निधन झाले होते. त्‍यानंतर काही महिन्‍यांपूर्वीच त्‍यांच्‍या आईचेही निधन झाले होते. आई आणि मुलाच्‍या मृत्‍यूमुळे जूदेव मानसिकरित्‍या खचले होते.

जूदेव यांच्‍यावर लाचखोरीचे आरोप झाले होते. एका वृत्तपत्राने केलेल्‍या स्टिंग ऑपरेशनमध्‍ये त्‍यांना लाच घेताना दाखविण्‍यात आले होते. त्‍यावेळी ते केंद्रीय पर्यावरण मंत्री होते. याप्रकरणानंतर त्‍यांना राजीनामा द्यावा लागला होता. त्‍यावेळी छत्तीसगढमध्‍ये राजकीय खळबळ उडाली होती.