आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Dilsukhnagar Blasts NIA Court Convicted Yasin Bhatkal And 4 Other Indian Mujahideen (IM) Terrorists

हैदराबाद बॉम्बस्फोट: आयएमच्या यासिन भटकळसह चार दोषी, 19 डिसेंबर रोजी होणार शिक्षेची सुनावणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हैद्राबाद : एनआयएच्या विशेष न्यायालयाने २०१३ मध्ये झालेल्या दिलसुखनगर स्फोटात आयएम (इंडियन मुजाहिदीन)च्या यासीन भटकळसह चार जणांना दोषी ठरवले आहे. इंडियन मुजाहिदीन या संघटनेवर बंदी घातलेली होती.
या संघटनेचा सदस्य दहशतवादी कारवायांमध्ये दोषी आढळल्याची ही देशातील पहिली घटना आहे. यांच्या शिक्षेची सुनावणी १९ डिसेंबर रोजी होणार आहे. विशेष न्यायालयाने मोहम्मद अहमद सिद्धीबप्पा ऊर्फ यासिन भटकळ शिवाय या प्रकरणी उत्तर प्रदेशच्या असदुल्लाह अख्तर, पाकिस्तानी नागरिक जिया उर्रहमान ऊर्फ वकास, बिहारच्या तहसीन अख्तर ऊर्फ मोनू आणि महाराष्ट्राच्या अजीज शेख ला दोषी ठरवले आहे.
हे सर्व सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि आयएमचा संस्थापक रियाज भटकळ सध्या फरार आहे. एनआयएने दावा केला आहे की त्याने कराचीत आश्रय घेतला आहे. २१ फेब्रुवारी २०१३ रोजी झालेल्या स्फोटात १८ लोकांचा बळी गेला तर १३१ लोक जखमी झाले होते.
गेल्या वर्षी या प्रकरणाची सुनावणी सुरू झाली होती. न्यायालयात एकूण १५७ साक्षीदार हजर केले गेले. एनआयएचे संचालक शरद कुमार यांनी सांगितले की, तपास पथकाने सर्व बाबींची सूक्ष्म पडताळणी केली. न्यायालयाने आरोपींना कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी करणार असल्याचे कुमार यांनी सांगितले.

संपर्कासाठी प्रॉक्झी सर्व्हरचा वापर : एनआयएच्या तपासात आणखी एक चकित करणारे वास्तव समोर आले. कट रचताना सर्व आरोपी आपल्या म्होरक्याच्या संपर्कात होते. ते इंटरनेटवर प्रॉक्झी सर्व्हरच्या माध्यमातून संवाद साधत होते.
या माध्यमातून चॅटिंग व कॉल सुरू असत. जागा बदल व लपण्यासंबंधी सल्लामसलत यावरून होत. कटात यासिन अख्तर आरोपींना पैसे, जागा व इतर रसद पुरवत होता. त्याने फरार होण्यासाठीही त्यांची मदत केली.
स्फोटांमध्ये 18 लोकांचा मृत्यू
- 21 फेब्रुवारी 2013 ला दिलसुखनगर भागात कोणार्क और वेंकटादिरी सिनेमागृहात स्फोट झाले होते. यात 18 लोकांचा मृत्यू झाला होता.

कोण आहे यासीन भटकळ?
- यासीन हा कर्नाटकच्या उडुपी जिल्ह्यातील भटकळ या गावचा रहीवाशी असून दहशतवादी संघटना आयएमचा को-फाउंडर आहे.
- आयएमच्या दहशदवाद्यांवर अहमदाबाद, सूरत, बेंगलुरु, पुणे, दिल्ली आणि हैदराबाद यासह अनेक शहरांत बॉम्बस्फोट केल्याचा आरोप आहे.
पुढील स्लाईडवर बघा, यासिन भटकळ याला अशा प्रकारे न्यायालयात सादर करण्यात आले....
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...