आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाऊबाई जोरात... मुलायमसिंहाच्या दोन्ही सूना एकाच मंचावर, अपर्णाच्या प्रचारासाठी डिंपल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनऊ - मुलायमसिंह यादवांच्या कुटुंबात अनेक वाद असल्याच्या चर्चा निवडणुकीच्या आधीपासून सुरु आहेत. त्या चर्चांना पूर्णविराम देण्यासाठीच की काय मुलायसिंहाच्या दोन्ही सूना आज एका मंचावर दिसल्या. अखिलेश यादव यांची पत्नी डिंपल आणि प्रतिक यांची पत्नी अपर्णा यादव यांनी एका रॅलीला संबोधित केले. लखनऊमधील हिंडोला येथे अपर्णा यांच्या प्रचारासाठी डिंपल यादव आल्या होत्या.
 
लखनऊ कँट येथून उमेदवार आहे अपर्णा
- मुलायमसिंहाची धाकटी सून अपर्णा या लखनऊ कँट येथून समाजवादी पक्षाच्या उमेदवार आहेत. त्यांची ही पहिलीच निवडणूक आहे. 
- काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या रिता बहुगुणा या त्यांच्याविरोधात येथून निवडणूक रिंगणार आहेत.        
 
डिंपल यादव म्हणाल्या, योजना सांगत बसले तर येथेच संध्याकाळ होईल... 
- डिंपल यादव यांच्या भाषणांमध्ये आता बरीच सुधारणा झाली आहे. त्यांच्या बोलण्यात आता नवखेपणा जाणवत नाही. कन्नौज येथून खासदार असलेल्या डिंपल म्हणाल्या समाजवादी सरकारने पाच वर्षांत अनेक मुलभूत सोयी-सुविधांचे काम केले आहे. ताज नगरीला लखनऊसोबत जोडण्याचे महत्त्वाचे काम अखिलेश यांच्या नेतृत्वात सपा सरकारने केले आहे. 
- आगरा - लखनऊ एक्स्प्रेस वेचे काम अतिशय वेगाने झाले आहे. एवढ्या वेगाने देशात कोणताच एक्स्प्रेस वे तायर झाला नसल्याचा दावा डिंपल यांनी केला. 
- एक्स्प्रेस वे हा विकासाचा मार्ग असल्याचे सांगत डिंपल म्हणाल्या, सरकारच्या योजना आणि काम सांगत बसले तर येथेच संध्याकाळ होईल. 
- अपर्णा यादव म्हणाल्या, 'समाजवादी पक्षाने राज्यात अनेक चांगली कामे केली आहेत. काँग्रेससोबतची आघाडी कोणत्याही फायद्यासाठी नाही तर विभाजनवादी शक्तींना रोखण्यासाठी केली आहे. 19 फेब्रुवारी रोजी सायकल शिवाय कोणतेही दुसरे चिन्हा पाहू नका आणि बटन दाबा.'
सूनेच्या प्रचारासाठी सासरे मुलायमही आले 
- अपर्ण यांच्या प्रचारासाठी त्यांचे सासरे आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते मुलायमसिंह यांनी बुधवारी सकाळी एका सभेला संबोधित केले.
- मुलायमसिंह म्हणाले, ही माझी सून आहे आणि आपल्या सन्मानाची लढाई आहे. 

पुढील स्लाइडवर क्लिक करून व्हिडिओतून पाहा, मुलायम यांच्या दोन्ही सुनांमधील केमिस्ट्री....
                          
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
बातम्या आणखी आहेत...