आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमित शहांच्या कसाबच्या वक्तव्यावर डिंपल यादवांचा पलटवार, स्मृती इराणींवरही हल्‍लाबोल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हे छायाचित्र खासदार डिंपल यादव यांच्या जाहीर सभेचे आहे.  उपस्थितांतून गोंधळ वाढल्याने त्या म्हणाल्या, शांत व्हा. आरडाओरडीची मला भीती वाटते. - Divya Marathi
हे छायाचित्र खासदार डिंपल यादव यांच्या जाहीर सभेचे आहे. उपस्थितांतून गोंधळ वाढल्याने त्या म्हणाल्या, शांत व्हा. आरडाओरडीची मला भीती वाटते.
गोंडा- येथील एका जाहीर सभेत बोलताना खा. डिंपल यादव यांनी स्मृती इराणी भाषणात केवळ डायलाॅगबाजी करतात, अशी टीका केली. त्या म्हणाल्या, स्मृती जे काही बोलतात त्यात वस्तुस्थितीचा लवलेश नसतो. स्मृती इराणी टीव्ही-चित्रपट माध्यमाशी संबंधित आहेत, त्यामुळे त्या केवळ डायलॉगबाजी करतात. उत्तर प्रदेशात निवडणुकीच्या निमित्ताने विविध नेत्यांनी अारोप -प्रत्यारोपांची राळ उडवून दिली आहे. 
 
अमित शहा यांनी ‘कसाब’बद्दल केलेल्या वक्तव्याचा समाचार घेताना डिंपल यादव म्हणाल्या, त्यांनी कसाबचा नवा अर्थ सांगितला आहेे. भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी निवडणूक प्रचारात काँग्रेस, समाजवादी पक्ष आणि बसपाला ‘कसाब’ असे संबोधले होते. 
 
भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार डिंपल यांनी घेतला. त्या म्हणाल्या, ‘क म्हणजे कॉम्प्युटर, स - स्मार्टफोन, ब म्हणजे बहिणींसाठी अनेक योजना...’  

 
बातम्या आणखी आहेत...