आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अण्णाद्रमुक दिनाकरन गटाची निवडणूक आयोगाकडे धाव

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली / चेन्नई- अण्णाद्रमुकच्या दिनाकरन गटाने मंगळवारी निवडणूक आयोगाकडे एक कॅव्हेट दाखल केले आहे. पलानीस्वामी आणि पन्नीरसेल्वम गटाने आयोगाकडे काही मागण्या केल्या तर निर्णयापूर्वी त्यांना आपली बाजू मांडण्याची संधी मिळावी म्हणून हे कॅव्हेट दाखल करण्यात आले.
 
पक्षाच्या के. ई. पलानीस्वामी आणि आे. पन्नीरसेल्वम गटाने नुकताच विलीनीकरणाचा निर्णय घेतला होता. पक्षाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही गटांनी नवी दिल्ली येथे बैठक घेतली. बुधवारी ते निवडणूक आयोगाकडेदेखील जाण्याची शक्यता आहे. या दरम्यान ते आपल्या पक्षाला खऱ्या अर्थाने अण्णाद्रमुक म्हणून आेळख मिळवून देऊ इच्छितात. त्यांना ‘दोन पानां’ची निवडणूक निशाणी हवी आहे. दिनाकरन गट आपल्या गटालाच मूळ अण्णाद्रमुक संबोधत आहे. त्यांनाही हीच निशाणी हवी आहे. या पार्टी चिन्हासाठी दोन्ही गटांत रस्सीखेच सुरू असून दिनाकरन यांनी कॅव्हेट दाखल केले. त्यांनी यात म्हटले आहे की, अण्णाद्रमुक (अम्मा)च्या महासचिव व्ही. के. शशिकला आणि उप महासचिव दिनाकरन यांची बाजू ऐकणे अनिवार्य आहे.  

अण्णाद्रमुक प्रमुख जयललिता यांच्या निधनानंतर पक्षाच्या या दोन गटांमध्ये टोकाचे मतभेद आणि पदासाठी रस्सीखेच सुरू आहे. एप्रिलमध्ये चेन्नईच्या आर. के. नगर विधानसभा जागेसाठी पोटनिवडणुका झाल्या. या वेळीदेखील दोन्ही गटांनी स्वत:ला मूळ अण्णाद्रमुक पक्ष असल्याचे म्हटले होते. त्यानंतर पन्नीरसेल्वम गटाला अण्णाद्रमुक (पुराची थैलीवी अम्मा) आणि दिनाकरन गटाला अण्णाद्रमुक (अम्मा) या नावांनी मान्यता मिळाली.
बातम्या आणखी आहेत...