आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चर्चेसाठी श्रीनगरला पोहोचले दिनेश्वर, कांग्रेस म्हणाले-काश्मिर धोरणावर केंद्राचा यू-टर्न

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिनेश्वर शर्मा म्हणाले होते की, मला काश्मिरींच्या वेदना कळतात आणि त्यामुळेच मला तोडगा शोधायचा आहे. - Divya Marathi
दिनेश्वर शर्मा म्हणाले होते की, मला काश्मिरींच्या वेदना कळतात आणि त्यामुळेच मला तोडगा शोधायचा आहे.
श्रीनगर - केंद्र सरकारने काश्मिरसाठी संवादक म्हणून नियुक्त केलेले दिनेश्वर शर्मा (61) चर्चेसाठी 5 दिवसांच्या काश्मिर दौऱ्यावर पोहोचले आहेत. शर्मा 3 दिवस काश्मिरमध्ये आणि 2 दिवस जम्मूमध्ये असतील. याठिकाणी ते राज्यपाल एनएन वोहरा, सीएम मेहबुबा मुफ्ती आणि इतर अनेक शिष्टमंडळांशी चर्चा करतील. रविवारी ते म्हणाले होते की, माझ्याकडे जादुची छडी नाही, पण शांतता प्रस्थापित करण्यासाठी कायमस्वरुपी तोडगा शोधण्याचा प्रयत्न असेल. दरम्यान, नॅशनल कॉन्फरन्सने म्हटले की, काश्मिरमध्ये चर्चेला येऊन काहीही हाती लागणार नाही. 24 ऑक्टोबरला सरकारने शर्मा यांना काश्मिर मुद्द्यावर संवादक म्हणून नियुक्त केले होते. शर्मा यांनी कॅबिनेट सेक्रेटरी दर्जा देण्यात आला आहे. 

काश्मिर मुद्द्यावर सरकारचा यू टर्न
- न्यूज एजन्सीच्या वृत्तानुसार जम्मू-काश्मिरचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जीए मीर म्हमाले, गेल्या 3 वर्षांपासून सरकार हेच म्हणत आहे की, त्या लोकांशी चर्चा करणार नाही, जे कायद्याच्या चौकटीत राहून चर्चा करणार नाहीत. आज बीजेपी म्हणतेय की, आम्ही खुल्या चर्चेसाठी तयार आहोत. हाच भाजपचा यू टर्न आहे. 
- मीर म्हणाले की, काश्मिरमधील पीडीपी-बीजेपी सरकार सर्व पातळ्यांवर अपयशी ठरले आहे. ते म्हणाले, सरकारला जर राज्यांमध्ये सर्वांशी बोलायचे असेल, तर त्यांनी रोडमॅप तयार करायला हवा. 
- आम्ही गेल्या 15 दिवसांपासून स्टेकहोल्डर्सची यादी मागत आहोत, पण ते त्यांना पडद्यामागेच ठेवत आहेत. पीडीपी-बीजेपी सरकारला 3 वर्षे झाली आहेत. पण एकही आश्वासन पूर्ण केलेले नाही. दोन्ही पक्ष राज्याला विभागण्याचे काम करत आहेत. मध्ये जनतेचे नुकसान होत आहे. 

आधी काहीही ठरवू नका...
- गुप्तचर विभागाचे माजी प्रमुख शर्मा म्हणाले की, काश्मिरमधीव विविध पक्षांबरोबर चर्चा सुरू होण्यापूर्वी कोणत्याही निर्णयापर्यंत पोहोचणे योग्य नाही. माझ्या कामाच्या आधारावरच माझे मूल्यमापन केले जावे. विनाकारण हवेत बाण सोडून फायदा नाही. 
- ते म्हणाले, उन्होंने कहा, मला काश्मिरींच्या वेदना कळतात आणि त्यामुळेच मला तोडगा शोधायचा आहे. गुप्तचर विभागात असताना काश्मिर माझे दुसरे घर होते. पहिल्यांदा जेव्हा मी काश्मिरला गेलो तेव्हापासून आतापर्यंत काहीही बदलले नाही. काश्मिरीपणा तसाच कायम आहे, असेही शर्मा म्हणाले. 
 
बातम्या आणखी आहेत...