कोच्ची - केरळचे पोलिस महानिरीक्षक (आयजी) टी.जे. जोस यांच्यावर सोमवारी एलएलएमच्या परीक्षेत कॉपी करण्याचा आरोप करण्यात आला आहे. यानंतर गृहमंत्री रमेश चेन्नीथला यांनी चौकशीचे आदेश देत त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवले आहे.
एमजी विद्यापीठाच्या एलएलएम अभ्यासक्रमातील क्राइम-२ विषयाचा पेपर सेंट पॉल कॉलेज कलमासेरी येथे सुरू होता. यादरम्यान आयजी जोस हे कॉपीतून पाहून उत्तरे लिहिताना आढळले. विद्यापीठाचे कुलगुरू बाबू सॅबेस्टियन यांनी कॉलेजकडून अहवाल मागवला आहे.